Popular Posts

Sunday, October 23, 2022

कविता

अच्छे दिन

अजुनी पहा वाट जराशी 
अच्छे दीन येणार आहे?
सगळा देश विकल्यावर
आपण कुठे राहणार आहे

जाता जाईना जात मनातून
मन की बात किती करावी?
समता बंधुता, राहिली कुठे?
चींद्या सनातनी जळणार आहे

मनुस्मृतीच्या ओझ्याखली
देव धर्माला असे फसविता 
लोकशाहीचा गळा घोटता
पहाट उद्याची फुलणार आहे

फिरून झाले सगळे जग
तरी तुम्हाला जाग येईना
किती झुलविता जनतेला
रावण तुमचा होणार आहे

असले सरकार या देशाने
अजुन तरी पाहिले नाही
संविधानाला धक्का देता
कुठली शाही आणणार आहे

शेतकऱ्यांचे दुःख दाबून
उद्योजकांचे लाड पुरवता
खळगी पोटाची भरण्यासाठी
कोणता देव येणार आहे

खुर्ची जेंव्हा जाईल तुमची
वणवा मताचा लागल्यावर
सत्य अहिंसा व समतेचा
डंका पुन्हा वाजणार आहे


दशरथ यादव, पुणे (पुरंदर)
9881098481

नकोस आठवू

नकोस आठवू आता तू बुजून गेल्यात वाटा
काठ नदीचा अजून छळतो
मनात ऊसळती लाटा

हसून बोलणे बोलून हसणे 
अजून हृदयी खुपते
होकराचा बाण जिव्हारी
अंगावरी येतोय काटा

आता अताशी कुठे सवय झाली तुला विसरण्याची
 चांदणे डोळ्यात पाहिले तुझ्या तरी झाला बोभाटा 

हवी हवीशी वाटत राहायची भेट घडीची 
कधी ना आली वेळेवर 
मग शोधायची पळवाटा

अजून पुसतो वारा, सखे तुझी ख्याल खुशाली
मन बिचारे शोधत राहते
 तुझ्याच पाऊलवाटा

दशरथ यादव,पुणे (पुरंदर)
9890895002

शिवार आलाय पेरणीला

तुझा शिवार आलाय पेरणीला...पेरणीला
तू कशाला लागतेस झुरणीला सखे झुरणीला. //ध्रु//

पाणी वाहतया खळा खळा
घाम गाळून शेती करू
सरीत लाऊन उसाचे बेण
पेरा पेरात साखर पेरू

उन्हाच्या झळा सोसूनी कळा, पडल्यात भेगा धरणीला
तुझा शिवार आलाय पेरणीला सखे पेरणीला //१//

पीक आलया लय जोमात
पाखरं लागल्यात भिरभिरू
शिवार डोळ्यात मावणा
मन लागलंय आता झुरू

खडे मारतय पाखरू गोफणीला, आलाय पीक राखणीला
तुझा शिवार आलाय पेरणीला सखे पेरणीला//२//

ओलंचिंब झालंय रान
पावसाची सर संगतीला
कसा सावरू पदर आता
वाराही आलाय गमतीला

धरून नेम ताणलाय बाण, शिकारी छळतो हरणीला
तुझा शिवार आलाय पेरणीला सखे पेरणीला


गीतकार दशरथ यादव,पुणे (पुरंदर)
मो 9881098481

रुताड

जिंदगी च्या वावराला रूतु लागले रुताड
उखडूनी अंध रुढी उघडे पाडले सताड

श्रम कसून ओतलं फुलवली फुलबाग
मध चाखाया आलीऐतखाऊ गिधाडं

सनातनी नांगराने अवघा समाज पोखरला
 चागळतात हे साले समरसतेची चिपाड

धमण्यातून वाहते रक्त सांगा कोणत्या धर्माचे
जातीपातीने पाडले काळजाला भगदाड

माती कसून रानात धान पेरलया मनात
भूक पोटाची भागेना घेतलं पाठीवर बिऱ्हाड

हिरवाईने नटले रान वारा झालाय मुऱ्हाळी
रुणझुन पैंजन वीजढगात कडाड

जवानीत आले रान पिकावयाचे छान
शिवारातच काढू आता सोन्याचं धुराड


कवी दशरथ यादव,पुणे 


पावसाळा सोसलं का?

पावसाचे थेंब लय आहेत चावट,सखे सावरुन बसशील का?
माझ्या गावाक येशील का? तुला पावसाळा सोसलं का?   //ध्रु//

तुझ्यासाठी सोडलं घर,फिरतोय दारोदार, कुठं कुठं फिरायच?
भोवताली हजार नजरा,अंग आता चोरशील का?  //१//

पावसात भिजायची तुला लय खोड, गुलाबाचे ओठ जणू संत्रची फोड
तू फुलांशी बोलशील का? //२//

चिंबवून तुला सखे झाला पाऊस लाजरा, लपवू नकोस आता गोड गुलाबी चेहरा
आरसा तू दावशील का?   //३//

पावसाचा नाही नेम, तुझा आवर पसारा चोरुन बघतोय तुझ्या वेणीतला गजरा
तू गुपित सांगशील का?   //४//


वीज दाखवूनी भीती, मेघ घेईल मिठीत डलिंबीचे दाणे बसेन चोचीने टीपित
तू बावरून जाशील का? //५//


गीतकार
दशरथ यादव, पुणे (पुरंदर)
मो.988

बांधावरती बसून सौदा

बांधावरती बसून सौदा, कोण करतो लेकाचा
बळीराजाला फसवून दलाल मलिदा खातो लाखांचा. //ध्रु// जी जी जी

घाम गाळून कसतो शेती
सोनं पिकवितो मातीत
शिवाराची बघून पंढरी
विठ्ठल येतोय रानात

दोन वेळेचे अन्न खाता सांगा कोणत्या बापाचे?
सांग मर्दा या देशाचा मालक आहे कोण रं //१// जी जी जी

दुष्काळ, वादळ आपत्तीचा
शेतीला बसतो फटका रं
भरडून जातो शेतकरी
अन् जीवाला लागतोय चटका रं

उद्योग व्यापारी लालेलाल कसला बनविता कायदा रं
शेतीसाठी देता सवलती कोण उठवितो फायदा रं //२//

दोन जुड्या मेथीसाठी
पन्नास गड्ड्या चाळता रं
लय लागलं महाग म्हणत
चवीने तुम्ही गिळता रं

देणं फुकाच अन् बोलणं झोकाच कुठे भोगताल सजा रं 
दीड दिवसाचे सरकार तुमचे? कशाला मारताय गमजा रं//३// जी जी जी

या मातीतून पेटून उठेल
शेतकऱ्यांचा जथा रं 
देशद्रोही भडव्याणा मग बसतील केपटात लाथा रं  

कामगार मजूर शेतकरी या  भूमीचा आहे राजा रं
भरलाय तुमचा घडा दिवस शेवटचे मोजा रं //४// जी जी जी

कवी/ गीतकार
दशरथ यादव, पुणे (पुरंदर)
मो 9881098481

उन्हात चांदणं पडतंय

भर उन्हात चांदणं पडतंय ग
सखे काही तरी अवचित घडतंय. //ध्रु//

पहिल्या भेटीची ओढ मनात
सखे आहे अजून ताजी
सारीपाटाचा डाव मांडाया
झालंय मन माझे राजी
पायीच पैंजण झुरतय 
तुझ्या दारात पाऊल अडतय ग //1//

दारात चांदणं घरात नांदन
अहो हरवून गेली रात
मालवाना सख्या तुम्ही
हळू हळू दिव्याची वात
चिंचा आणि बोरं खावं वाटतंय
उसात कोल्ह रडतंय ओ //2//

आठवण येता प्राण सख्याची
दाद देतेय गाली हसून
सकाळी सकाळी येईल मुरहाळी
म्यान्यात जायचयं बसून
सनई चौघडा दारी वाजतोय
ओढ जीवाला छळते य ग. //3//


गीतकार 
दशरथ यादव, पुणे (पुरंदर)
मो. 9881098481माझ्या गावाला तुम्ही यावा

भक्तिभावानं जपून ठेवलाय शिल्पकलेचा ठेवा
माझ्या गावाला तूम्ही यावा गड भुलेश्वर पाहावा. //ध्रु//

चौकमधील गर्दी घालते
धार पाण्याची भुलोबला
शंभो भुलेश्वर देवाचा
उभा आधार गावाला

माळशिरस ची पांढर माती जुन्या परंपरेचं सोने
शिरसाई कोटाई मातृदेवता इतिहासाचा ठेवा //१)//

इथली माणसं हाय लय गुणी
सगळीच आहे देवावाणी
ओढ्याकाठी चिंचेची बाग
झराही गातोय गाणी

वारा घालतोय शीळ भेलन डोंगरावर
हर हर महादेव करीत पाखरांचा नाचे थवा /)२//

आभाळाचा मंडप गावी
चंद्र सूर्याची झुंबरं
क्षितिजावर चढते लाली
शिवेवर टेकले अंबर

अल्लड राधा कृष्ण सावळा पिकावितो कुणबावा
शेतामध्ये अजून वाजतो यादवांचा पावा ,//३//

गीतकार दशरथ यादव, पुणे ( पुरंदर)
मो. 9881098481

 भेटायचे दिस पुन्हा..

नको ग बघू सखे आता मागे वळून
भेटायचे दिस पुन्हा आलेत जुळून //ध्रु//

तुझे येणं म्हणजे सखे 
जणू झुळूक वाऱ्याची
आठावांच्या आभाळाला
झुंबरं चंद्र ताऱ्यांची

व्हॉट साप फेसबुक तू पहायची चोरुन
तुझे मुक् मुक बोलणे यायचं कळून//१//

राग तुझा काढताना 
रात जायची सरून
इमोजीचे डोळे सुद्धा 
सखे यायचे भरून 

चॅट करीत किती दिस राहायचे झुरून
सोड ना राग तुझा आता झालं की छळून//२//

धीर धरवेना आता 
मन झालंय अधीर
काळजाला लागली
तुझ्या मिठीची हुरहूर

चतुर तू चांदणी आलं आभाळ भरून
पुनवेचा चंद्र तुझ्याव गेलाय   भाळून //३//


कवी/गीतकार
दशरथ यादव, पुणे(पुरंदर)
मो 9881098481
[23/08, 7:49 PM] Tilekar Kalpana: ,नकोस आठवू

नकोस आठवू आता तू बुजून गेल्यात वाटा
काठ नदीचा अजून छळतो
मनात ऊसळती लाटा

हसून बोलणे बोलून हसणे 
अजून हृदयी खुपते
होकराचा बाण जिव्हारी
अंगावरी येतोय काटा

आता अताशी कुठे सवय झाली तुला विसरण्याची
 चांदणे डोळ्यात पाहिले तुझ्या तरी झाला बोभाटा 

हवी हवीशी वाटत राहायची भेट घडीची 
कधी ना आली वेळेवर 
मग शोधायची पळवाटा

अजून पुसतो वारा, सखे तुझी ख्याल खुशाली
मन बिचारे शोधत राहते
 तुझ्याच पाऊलवाटा

दशरथ यादव,पुणे (पुरंदर)
9881098481Z