संमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार
साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव
दशरथ यादव यांची माहिती
सासवड़, ता.३१ ः ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाला संत सोपानदेव , साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निणर्य स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार व अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. अशी माहिती संमेलनाचे राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी दिली.
यंदाचे संमेलन वादाशिवाय व्हावे, असा प्रयत्न सुरवातीपासूनच संयोजक समितीने केला होता.
संमेलनातील सभागृहांना आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक, महात्मा फुले व श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांची नावे देण्यात येणार आहेत. ग्रंथनगरीतील प्रकाशनमंचाला होनाजीबाळा यांचे तर प्रवेशद्वाराला भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची नावे देण्यात येणार आहेत. महर्षी वाल्मिकीचे नाव कविकट्टयाला देण्यात येणार आहे.
पुरंदर ही ऐतिहासिक भूमी असल्याने क-हाकाठी अनेक महापुरुष जन्माला आले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महापुरुषांच्या नावाचे स्मरण व्हावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. दरवर्षी संमेलन आणि वाद हे समीकरण होते. यंदा संमेलनाध्यक्ष निवडीपासूनच सगळ्या प्रक्रिया शांतते पार पडल्या. सगळ्याच दिग्गज महापुरुषांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न संयोजक समिती व महामंडळाने केला आहे.
दशरथ यादव
अध्यक्ष
राज्य प्रसिद्धी समिती
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मो.९८८१०९८४८१