Popular Posts

Saturday, July 14, 2012

छत्रपती घराणे...


छत्रपती घराणे...!!!

छत्रपती घराणे...!!!

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदाशिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदरअन तुम्हीच हो कोलंबस !
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतोज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळतेज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असेतमाम मराठी मनाचा मानबिंदूसह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्यराष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष, मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. 
        
चला तर मग या  वंदनीय छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याची धावती भेट घेवूया.


छत्रपती घराणे...!!!
चित्र:Shivaji Maharaj Rajmudra.jpg


बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)
त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले, त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या.
द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.
(अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी)

मालोजी भोसले(१५४२-१६१९)
पुत्र
१.शहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज)
२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.

शाहाजी भोसले (१५९४-१६६४)
शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!!
शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.
शाहाजी भोसले -- 
पत्नी १. - जिजाबाई -
पुत्र १. संभाजी (१६२३), २. छत्रपती शिवाजी महाराज ! 
पत्नी २. - तुकाबाई - पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )
पत्नी ३. -  नरसाबाई - पुत्र-संताजी.

छत्रपती शिवाजी महाराज
पत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ), कन्या-- राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)
पत्नी २. सईबाई (नाईक निम्बाळकर यांची कन्या), पुत्र  संभाजी,   कन्या- सखूबाई व इतर २
पत्नी ३.सोयराबाई(हंबीर राव मोहितेंची बहीण), पुत्र  - राजाराम, कन्या- बळीबाई
पत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)
पत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ), कन्या -कमळाबाई
पत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)
पत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)

धर्मवीर छ. संभाजी  महाराज - (१६५७-१६८९)
मातोश्री - सईबाई, पत्नी - येसूबाई, पुत्र --शाहू (१६८२-१७४९) -
संभाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.

शाहू महाराज - 
मातोश्री - येसूबाइ , 
पत्नी - १. सकवारबाई, २. सगुणाबाई.  (शाहू निपुत्रिक होते)

छ. राजाराम - 
मातोश्री :- सोयराबाई,
पत्नी - १. ताराबाई (१६७५-१७६१), पुत्र - शिवाजी(१६९६-१७२६)
२.जानकीबाई
३.राजसबाई - पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०)
४.अम्बिकाबाई (सती गेली)
५. सगुणाबाई
राजारामाचा महाराजांचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला.  त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.  तर असे हे संक्षिप्तरुपात  छत्रपती घराणे...!!! 
        यापुढचे तुम्हा आम्हास माहीतच आहे.. सध्या छत्रपतींचे वारस काय करत आहेत ते... पण तुम्ही जर स्वताला शिवरायांचे वारस समजत असाल तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीतीजातीभेदअज्ञानशासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू..!
         शेवटी स्वाभिमानाच्या सूर्यालापर्वतासारख्या खंबीर राजालाजिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...!!!

No comments: