Popular Posts

Wednesday, July 25, 2012

महानामा


महानामा

जगणं सोपं करणाऱ्या नामाचा गजर करणाया हा महानामा. महामानव महाद्रष्टा जगाला प्रकाश देणारी आपली सहिष्णू परंपरा नामदेवांनी उजळली. नामदेवांचा काळ आणि त्यांचं मोठेपण यावर एक वेगळाच प्रकाश टाकत आहेत, रिंगणचे संपादक श्रीरंग गायकवाड

पहिली आठवण आहे. गाभा-यातल्या समईच्या उजेडात विठुरायाचा सावळा चेहरा उजळून निघालाय. डोळे मिटून मोठ्या प्रसन्न चित्तानं तो ऐकतोय, ‘उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा..’, ‘उठा जागे व्हा रे आता...’ स्पष्ट, खणखणीत आवाज, सुंदर वारकरी चाल. पांढराशुभ्र फेटा बांधलेले वडील नामदेवरायांचा काकडा म्हणतायत. पहाटेच्या शांततेत आवर्तन घेत येणारे ते सूर हृदयात जिरतायत. मुरतायत. मी बहुदा आईच्या पोटात आहे…
हे नामदेवराय पुढं कुठं कुठं भेटतच राहिले. ज्ञानेश्वरी पारायणाच्यावेळी मधल्या ब्रेकमध्ये वडील पुढं म्हणायचे. आम्ही मागे म्हणायचो. 
‘ज्ञानाबाई माझी योग्यांची माऊली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।।
गीताअलंकार नाम ज्ञानेश्वरी...’ 
नामदेवरायांनी गायलेला ज्ञानदेवांचा महिमा. अतिव करुणेचे ते शब्द मायेचं पांघरुन घालायचे. आळंदीत माऊलींच्या मंदिरात गेलं की पाठीमागच्या भिंतीवर माऊलींच्या समाधीप्रसंगाचं चित्र. निवृत्तीनाथादी भावंडांसोबत नामदेवराया उभे आहेत. ठळकपणे. शेजारी त्यांनीच केलेलं सोहळ्याचं वर्णन,
‘नदीचिया माशा घातले माजवण। तैसे जनवन कालवले।
दाही दिशा धुंद उदयास्ताविण। तैसेचि गगन कालवले।।
त्या चित्रासह हा अभंग मनावर कोरला गेलेला.  
भाद्रपदात गणपतीचा जल्लोष. सामूहिक घोषात सुरू असलेल्या आरतीच्या शेवटी नामदेवांचं ‘घालीन लोटांगण...’ डोळे मिटायचे. नकळत स्वत:भोवती गिरकी घ्यायची. पहाटे काकड्यात ऐकलेले नामदेवराय पुन्हा डोळ्यापुढं उभे राहायचे. ‘रिंगण’च्या निमित्तानं हे नामदेवराय पुन्हा भेटले
कसला आलाय सुवर्णकाळ!
नामदेव. जगणं सोपं करणा-या नामाचा गजर करणारा हा महानामा. महामानव. महाद्रष्टा. जगाला प्रकाश देणारी आपली सहिष्णु परंपरा नामदेवांनी उजळली. नामदेवांचं बालपण गेलं विठुरायाच्या पंढरीत. तसे ते मूळचे संतभूमीतले. मराठवाड्यातले. विठुरायाच्या ओढीनं अन् कामधंद्याच्या शोधात त्यांचे वडील दामाशेटी आले पंढरपुरात. देवळाच्या मागंच घर केलं. तिथलेच होऊन राहिले. या कुटुंबाला आपसूकच देवाचा अखंड शेजार मिळाला. बालनामदेवाची तर विठुरायाशी गट्टीच झाली. त्याच्या या सावळ्या दोस्ताला भेटायला आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं लाखो वारकरी यायचे. एरवीही सारखी माणसं येत राहायची. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून. ही नाना प्रकारची माणसं नामदेवांना लहानपणापासून पाहायला मिळाली. काही नाही. अनवाणी पावलं. खांद्यावर पडशी. अंगावर जाडीभरडी कापडं. चेह-यावर मात्र विश्वरुपदर्शन. नाना प्रकारचे व्याप-ताप, काळज्या-चिंता, दु:ख-दारिद्र्य, हे सारं त्य़ा रापलेल्या पण निग्रही चेहऱ्यांवर उमटलेलं असायचं. विठोबाचं मुखदर्शन होताच हे चेहरे उजळून निघायचे. ‘भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद...’ नामदेवाला मोठं आश्चर्य वाटायचं. कसले लोक आहेत? कुठून कुठून उन्हा-पावसात धडपडत, चालत येतात? बरं दिसतात तर एकदम गरीबडे, परिस्थितीनं गांजलेले. मग देवाकडं काही मागावं बिगावं तरी. पैसाअडका मिळू दे, घरीदारी आबादीआबाद होऊ दे. मुलाबाळांना सोन्याचे दिवस येऊ देत...यापैकी काहीही नाही. कमरेवर हात ठेवलेल्या या विठुरायाचा दर्शन झालं की विरघळले. त्याच्या पायावर डोकं ठेवलं की ब्रम्हानंद. आता काही इच्छा नाही. ‘तुझे पायी सुख सर्व आहे...’ नामदेवांच्या ओसरीवर ही मंडळी मुक्कामाला थांबायची. दामाजीपंतांना गावाकडची सुख दु:खं सांगायची. बापाजवळ बसलेले बालनामदेव या माणसांना बारकाईनं न्याहाळायचे.
खरं तर तो काळ काही बरा नव्हता. म्हणायला मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ होता. म्हणजे देवगिरीच्या यादव राजवटीचा वैभवशाली काळ. पण सर्वसामान्यांचा या वैभवाशी काहीही संबंध नव्हता. घरात दोन वेळचं खायला नाही न् व्रतवैकल्य, अनुष्ठानं, ब्राम्हणभोजन घालण्याची सक्ती. हो सक्तीच. कारण ते नाही केलं तर लेकराबाळांना सुख लाभणार नाही, असं धर्ममार्तंडांनी मनावर बिंबवलेलं. मुख्य म्हणजे राजाचीही या कर्मकांडांना मान्यता. ही कर्मकांडं सांगणारे शास्त्रकार त्यानंच पदरी बाळगलेले. हे यादव राजे सनातन वैदिक धर्माचे पुरस्कर्ते. वैदिक ब्राम्हण आणि शास्त्रीपंडितांना त्यांनी उदार आश्रय दिला. शारंगदेव, हरिपालदेव, लक्ष्मीधर, हेमाद्री आणि बोपदेव आदींना तर राजा रामदेवरायानं मंत्रीपद, सेनापतीपदासारखी पदं दिली होती. यादवांचे अनेक मंत्री आणि थोर अधिकारी ब्राम्हण होते. यात खोलेश्वर आणि हेमाद्री हे प्रसिद्ध. सेनापती हेमाद्री हा थोर शास्त्रकार होता. त्याने आणि इतर पंडितांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक संस्कृत ग्रंथांची रचना केली. हेमाद्रीनं ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ नावाचा व्रतं वैकल्यं सांगणारा ग्रंथ लिहिला. त्यात तब्बल दोन हजार व्रतं सांगितली होती. म्हणजे दिवसाला पाच-दहा व्रतं करायची. गरीब असो नाही तर श्रीमंत. शिवाय या व्रतवैकल्यांचं, धर्मनियमांचं जनतेनं पालन करावं, अशी राजाज्ञा. रामदेवाच्याच पुरुषोत्तमनायक नावाच्या मंत्र्यानं स्मृतीवचनांना अनुसरून वर्णाश्रम धर्माची स्थापना केली. परिणामी या काळात जातीभेद फारच कडकपणे पाळले जाऊ लागले. जाती बंदिस्त झाल्या. अठरापगड जाती घट्ट झाल्या. आपसातले रोटी-बेटी व्यवहार बंद झाले. गुन्ह्यांबद्दल जातीबाहेर काढण्य़ाची शिक्षा होऊ लागली. शिवाशिव, सोवळेओवळे यांचा जोर वाढला. धर्मबाह्य वर्तन करणा-या अस्पृश्यांना देहांताची शिक्षा दिली जाऊ लागली. विषमतेची बीजं पेरली गेली. समाजातला सलोखा कमी झाला.
कर्मकांडात अग्निहोत्र आणि पंचमहायज्ञ आदींचं महत्त्व वाढलं. ज्या घरात अग्निहोत्र होत नाही, तिथं पाण्याच्या थेंबालाही स्पर्श करू नये, असे संकेत रुढ केले गेले. तीर्थक्षेत्रांचं महत्व अतोनात वाढलं. हे कमी म्हणून की काय, नाना प्रकारची शेंदरी-हेंदरी दैवतं तयार झाली. त्यांना प्रसन्न करणारे, भूतबाधा वगैरे उतरवणारे देवऋषी तयार झाले. भोळ्या-भाबड्या जनतेला लुटू लागले. यासोबतच जुगार, वेश्याव्यवसायादी धंद्यांना बहर आला. ही सारी परिस्थिती परकीय आक्रमकांना फारच सोयीची वाटली.
अशा वेळी राजसत्तेला परखडपणानं सुनावणारं कोणी नव्हतं काय? होय होतं ना. महानुभव होते. लिंगायत होते. नाथपंथी होते. जैन होते. बौद्ध होते. पण तेच स्वत: क्षीण होत चालले होते. त्यांना राजाश्रय नव्हता. आता तो का दिला गेला नव्हता हेही जाणून घ्यायला हवं.
जातीभेद गाडणारे लिंगायत
यादवराजेपुरस्कृत शास्त्रीपंडितांच्या कर्मठ वैदिक धर्माला त्या काळात थेट विरोध करणारा प्रमुख पंथ म्हणजे लिंगायत पंथ. या पंथाचा उदय झाला कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यातल्या कल्याणी या लहान गावात. बसवेश्वरांनी या पंथाचं पुनरुज्जीवन केलं. जातीभेदाला विरोध हे या पंथाचं प्रमुख तत्व. विशेष म्हणजे बसवेश्वर स्वत: ब्राम्हण होते. लिंगायतांच्या धर्मसभेत बसवेश्वरांनी अस्पृशांना, स्त्रियांना मानाचं स्थान दिलं. त्या काळात दक्षिण भारतात शिव आणि वि्ष्णू या देवतांच्या भक्तांचा मोठा जोर होता. यात केरळमधले जे शिवभक्त होते त्यांना नायनार म्हणत. तर तमीळनाडूतील विष्णूभक्त होते, त्यांना अळवार म्हणत. यापैकी नायनारांच्या विचारांचा प्रभाव लिंगायतांवर पडला. अळवारांचा प्रभाव वारकरी, महानुभवांवर पडला. लिंगायतांनी जातीभेद अमान्य करत समता बंधुभाव स्थापनेचा प्रयत्न केला. बसवेश्वरांचं हे तत्त्वज्ञान कल्याणीचा कलचुरी राजा याला मान्य झालं नाही. विशेष म्हणजे बसवेश्वरच या राजाचे मुख्य प्रधान होते. यातून राजकीय बंड झाले. बसवेश्वरांनी महासमाधी घेतली! त्यांच्या अनुयायांनी हा पंथ पुढं निष्ठेनं चालवला. कल्याणी हे महाराष्ट्राच्या सीमेवरचं गाव. त्यामुळं महाराष्ट्रावर लिंगायतांचा, बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा मोठा प्रभाव पडला. गळ्यात लिंग धारण करणारे लिंगायत महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात पसरले. वाणसामानाचं दुकान टाकून गावक-यांच्या गळ्यातले ताईत बनले.
लोकभाषेचे पुरस्कर्ते नाथपंथीय
आपल्याकडं नाथ पंथाची मोठी परंपरा आहे. ‘अल्लख निरंजन’ असा खणखणीत आवाज देत दारी येणारे नाथपंथी साधू देशभरातल्या खेडोपाड्यांमध्ये परिचित होते. आहेत. दहाव्या शतकापासून हा नाथ पंथ भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात पसरायला सुरुवात झाली होती. या पंथाच मूळ संस्थापक मस्येंद्रनाथ अर्थात मच्छिंद्रनाथ. पण पंथप्रसाराचं प्रभावी कार्य केलं त्यांच्या शिष्यानं, गोरखनाथांनी. ज्या काळात संस्कृत भाषेचं प्रचंड अवडंबर माजवलं गेलं होतं, त्या काळात गोरखनाथांनी लोकांच्या भाषेत प्रचार करायला, लिहायला सुरुवात केली. ‘गोरखबानी’ म्हणून गोरखनाथांची पदं प्रसिद्ध आहेत.
मच्छिंद्रनाथ आणि गोरखनात या गुरुशिष्याच्या जोडीनं आख्खा देश उभा आडवा पिंजून काढला. आंध्र-केरळापासून उत्तरेत पश्चिम आणि पूर्व भागात नाथपंथाची केंद्रं उभी राहिली. गावोगावी गोरखनाथांचे पाईक निर्माण झाले. या गोरखनाथांचा नामदेवांवर मोठा प्रभाव आढळतो. उत्तरेत नामदेव गेले तेव्हा त्यांना आधार या गोरखनाथ परंपरेचाच होता. नामदेवांच्या हिंदी पदांची रचना थेट ‘गोरखबानी’प्रमाणेच आहे. हा पंथ महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातल्या वृद्धेश्वराच्या डोंगरावर स्थापन झाला, असंही सांगितलं जातं. पंचमढीची यात्रा तर प्रसिद्धच आहे. आंबेजोगाईत नाथपंथाचे एक केंद्र होतं. या नाथपंथाचा अजूनही जनमानसावर प्रभाव किती, तर आजही गावोगावी श्रावण महिन्यात ‘नवनाथ कथासार’ ग्रंथ वाचला जातो. गावातल्या धर्मनाथ, मुक्ताबाईच्या मंदिरात नित्यनेमाने पूजा होते. श्रावणाच्या मंगळवारी शेतीच्या सर्व कामांना विश्रांती देवून मुक्ताबाईचा ‘मोढा’ पाळला जातो. ‘आंबील’, ‘घुग-या’, ‘फुर्मोल’ करून धर्मरायाचा बीजोत्सव मोठ्या भक्तीभावानं साजरा केला जातो. नाथपंथीयांनी भरपूर वाड्.मय लिहिलं. अर्थात बोलीभाषांतून. त्यामुळं संस्कृत भाषेचा पुरस्कार करणा-या राजवटीला ते मान्य झालं नाही. या काळात बौद्ध धर्मही क्षीण होत चालला होता. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचा राजाश्रय कमी होत चालला होता. दक्षिणेतले सातवाहन-वाकाटकादी राजेही वैदिक धर्माचेच अनुयायी होते. गुजरात आणि कर्नाटकात जैन धर्माला राजाश्रय होता. पण महाराष्ट्रात या धर्माचा फारसा प्रचार नव्हता. खान्देश, विदर्भ, सांगली, कोल्हापूरसारख्या भागात त्यांचा प्रचार सुरू होता. पण तेवढ्यापुरताच.
राजसत्तेला तडाखा देणारे महानुभव
सामान्य जनतेमध्ये रुजणा-या या पंथांपैकी राजसत्तेला थेट जाब विचारण्याचं, तडाखा देण्याचं काम केलं ते महानुभव पंथीयांनी.या पंथाची स्थापना श्रीचक्रधर स्वामींनी पैठण इथं केली. हेही मूळचे सामवेदी ब्राम्हण. त्यांचं मूळ नाव हरिपाळदेव. विदर्भातल्या रिद्धीपूर इथल्या गोविंदप्रभू अथवा गुंडमराऊळ यांची भेट झाल्यानंतर चक्रधरांची ज्ञानशक्ती उजळली. गोविंदप्रभूंनीच त्यांचं नाव चक्रधर ठेवलं. चक्रधरस्वामी म्हणजे यादवकाळाचे उत्तम निरिक्षक आणि कठोर टीकाकार. हे सारं निरिक्षण त्यांनी लिहून ठेवलं. त्यांनी आपल्या मताचा प्रचार, प्रसार बहुजन समाजात केला. तोही अगदी जाणीवपूर्वक देशी भाषेत अर्थात मराठीत. त्यांनी महिलांनाही आपल्या पंथात प्रवेश दिला. या पंथाला मूर्तीपूजा मान्य नव्हती. व्रतवैकल्य, तीर्थ यांना त्यांचा विरोध होता. वैदीक कर्मकांडही त्यांना मान्य नव्हतं. कर्मकांडाला विरोध करणारं महानुभवांचं तत्वज्ञान हेमाद्री -बोपदेवासारख्या ध्रममार्तंडांना मान्य होणं शक्य़च नव्हतं. शिवाय त्यांचं संस्कृत भाषा नाकारणं म्हणजे तर राजसत्तेला थेटच विरोध होता. त्यामुळं त्यांना सत्ताधा-यांचा जाच होणं अत्यंत साहजिक होतं. रामदेवाच्या राजवटीवर चक्रमधरांनी अतिशय परखडपणे कोरडे ओढले. रामदेव संतमहंतांच्या बाबतीत ‘ओखट्या प्रवर्तला’ असे असे ते म्हणतात. चक्रधरांनी कृष्ण, महादेव, रामदेव अशा यादवांच्या चार पिढ्या पाहिल्या होत्या. रामदेवाविषयी तर ते म्हणतात, `काळेंकरोनी या राष्ट्राची समूळचि विनश्यन्ति होइल गा :` कारण रयतेवर कर्मकांडाची जबरदस्ती करणा-या या राजसत्तेत जोरदार गृहकलहही सुरू होता.महादेवराया मरण पावल्यानंतर मुलगा आमणदेव गादीवर बसला. पण महादेवाचा पुतण्या असलेल्या रामदेवाला हे सहन झालं नाही. त्यानं कपटानं आमणाचा पराभव करून त्याचे डोळे काढले आणि गादी बळकावली.चक्रधरांची भविष्यवाणी लवकरच खरी झाली. राज्यावर सुलतानी आक्रमण आलं.अल्लाउद्दीन खिल्जीने रामदेवाचा पराभव करून यादव साम्राज्याचा अंत केला.
राजसत्तेविषयी सामान्यांच्या मनातली खदखदच जणू चक्रधरांनी व्यक्त केली होती. सामान्यांना न कळणा-या संस्कृतमध्ये विद्वान लिहित होते. त्यामुळं समाज त्यांच्यापासून दूर गेला. त्यांना आपल्या भाषेत लिहिणारे, बोलणारे चक्रधर जवळचे वाटू लागले. पण चक्रधरादी मराठीच्या पुरस्कर्त्यांना राजाश्रय तर मिळाला नाहीच. उलट त्यांच्या वाट्याला छळच आला. मुकुंदराज-ज्ञानेश्वरांसारखे नाथसांप्रदायी थोर कवी, भास्कर-नरेंद्रासारखे अभिजात महानुभव ग्रंथकार यांना, त्यांच्या पंथाना यादव राजवटीने काडीचीही सहानुभूती दाखवली नाही. त्यामुळं जनमत या राजवटीच्या विरोधात गेलं. अर्थात नंतर सारं चित्रच पालटलं. महानुभवासारख्या पंथांनंही सर्वसामान्यांचा हात सोडला. हा पंथ नंतर विद्वानांचा बनला. महानुभवांचं साहित्य कूट लिपीच्या कड्याकुलुपांत बंद झालं.
अशा या ढासळत्या धार्मिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीमुळं परकीयांचं फावलं. दक्षिणेवर आक्रमणं सुरू झाली. इथली सुबत्ता लुटली गेली. त्यातच दुष्काळानं थैमान घातलं. त्यातून आधीच गांजलेला समाज ढेपाळला. हातपाय गाळून बसला. अशा त्यांना देवाधर्माचं भय दाखवून आपली तुंबडी भरणा-या प्रवृत्तींचं फावलं.
 नव्हे एकल्याचा खेळ
हे सारं नामदेवांच्या समोर घडत होतं. नामदेव ते सारं पाहत होते. ऐकत होते. समजून घेत होते. त्यांनी या परिस्थितीवर सखोल चिंतन केलं. अशा स्थितीत लोकांना धीर दिला पाहिजे. जगण्याचं बळ दिलं पाहिजे. ते कुठून येईल? असा विचार ते करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढं कटेवर कर ठेवून शांत मुद्रेनं उभ्या ठाकलेल्या सावळ्या विठ्ठलाची मूर्ती उभी राहिली. तिला पाहून समाधान पावणारी फाटकी माणसं दिसू लागली. नामदेवांना साक्षात्कारच झाला. हाच देव, हाच निर्मळ भक्तिभाव, त्यांचं शहाणपण जगाला समजावून सांगूया. नाना संहारक आयुधं धारण केलेल्या दैवतांऐवजी निशस्त्र, अहिंसेचा, सहिष्णुतेचा संदेश देणारा विठोबा आणि एकमेकांच्या पायावर डोई ठेवणारे त्याचे भक्त. जगात प्रेमाचा संदेश पोचवतील, याची नामदेवांना खात्री पटली. परिस्थिती पालटण्याचं सामर्थ्य समता, बंधुभाव सांगणा-या ‘वारकरी’ विचारांमध्ये असल्याची त्यांची ठाम भावना झाली. नामदेवांनी प्रतिज्ञाच केली, ‘शतकोटी’ अभंग रचण्याची!
नामदेवांच्या या प्रतिज्ञेतच सारं काही आलं आहे. ते समजून घेतलं पाहिजे. ही प्रतिज्ञा त्यांनी का केली हे वरच्या विवेचनात सारांशानं आलंच आहे. पण ती पूर्ण कशी केली हे पाहणंही मोठं रोमांचकारी आहे. नामदेव अनेक गोष्टींचे आद्यप्रवर्तक आहेत. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी निर्माण केलेला अभंग हा काव्यप्रकार. त्या काळात ज्ञानावर, साहित्यावर संस्कृतभाषेचा, विद्वानांचा पगडा होता. सामान्यांना ज्ञान द्यायला ही मंडळी तयारच नव्हती. अशा काळात या सामान्य लोकांच्या भाषेत, त्यांच्या जगण्याला बळ देणारं शहाणपण कोण सांगणार होतं? नामदेवांनी तो मक्ता घेतला. त्यांनी अभंग या छंदाची रचना केली. साधे शब्द, सोपी, लयबद्ध, लक्षात राहणारी वाक्ये. नामदेव अभंग लिहित राहिले. या अभंगांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी त्यांनी कीर्तन नावाचा साग्रसंगीत प्रकार सुरू केला. रोजच्या जगण्यातली उदाहरणं देत शेवटी तात्पर्य सांगणारा या कीर्तनानं अभंग प्रचंड लोकप्रिय केले. अगदी निरक्षर माणसांच्याही ते लक्षात राहू लागले. तोंडपाठ झाले. आजही खेडोपाड्यातली हजारो माणसं साधं बोलताना प्रमाण म्हणून अभंगाच्या ओळी म्हणून दाखवतात. नैतिक-अनैतिक, ख-या-खोट्याची तुलना हे अभंग प्रमाण मानून करतात. एवढ्यावरच नामदेव थांबले नाहीत तर त्यांनी घरातल्या सर्व सदस्यांना लिहायला शिकवले. अभंग रचायला शिकवले. त्यांना त्यांच्या भावना अभंगांतून व्यक्त करायला शिकवल्या. मग त्या नामदेवाला आणि त्याच्या देवाला शिव्या देणा-या का असेनात. यात पुढं नामदेवांनी चमत्कारच केला. अक्षरओळख तर दूरच पण ज्यांची सावलीसुद्धा अंगावर पडणं म्हणजे लोक पाप समजत असत, अशा अस्पृश्य, शूद्र लोकांनाही नामदेवांनी लिहितं केलं. चोखामेळ्याचं कुटुंब त्याचं उत्तम उदाहरण. आपल्या स्थितीबद्दल हे कुटुंब देवाला पर्यायानं समाजाला जाब विचारू लागलं. या कुटुंबाचे अभंग वाचून नामदेव किती भरून पावले असतील! केवळ चोखा मेळाच नाही तर त्याची ठिगळाचं लुगडं नेसणारी, काबाडकष्ट उपसणारी पत्नी सोयराबाई लिहू लागली.
अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग।
मी तू पण गेले वाया। पाहता पंढरीच्या राया।।
सोयराबाईचे हे अभंग म्हणजे मानवता सांगणारं जागतिक दर्जाचं साहित्य आहे. दुसरी ती दासी जनी. ती आठवली तरी मन भरुन येतं. कोण कुठली, बेवारशी बाई. तिला नामदेवाच्या कुटुंबानं सांभाळलं. झाडलोट, धुणभांडी, दळणकांडण, शेण, गोव-या अशी नामदेवाच्या कुटुंबाची सारी काम ही दासी जनी करायची. देव ख-या अर्थानं या कष्टकरी, अनाथ जनीला पावला. नामदेवांच्या भक्तीचा, प्रतिभेचा सारा वसा, वारसा या जनीकडं आला. जनाबाईचे अभंग किती सोपे, गोड आहेत माहितीये? खेडोपाड्यात अशी एकही निरक्षर बाई सापडायची नाही जिला जनाबाईची एक तरी ओवी येत नाही. पंढरपुरात राहिलेल्या जनाबाईला नामदेवाप्रमाणंच वारक-यांच्या रुपातला सारा समाज पाहायला मिळाला. समाजाविषयी तिचं स्वत:चं सखोल अनुभव चिंतन होतं. नामदेव-ज्ञानदेवांची जनाबाईच खरीखुरी प्रेरणा होती. जनाबाई नामदेवांपेक्षा वयानं मोठी होती. तर ज्ञानदेवांचं वय नामदेवांपेक्षा कमी. नामदेवाला जनाबाईनं लहानपणी कडेखांद्यावर सांभाळलेलं. त्याला चिऊकाऊचा घास भरवलेला. बोबडेबोल बोलायला शिकवलेले. कडेवर घेऊन विठोबा दाखवलेला. हे नामदेव जनाबाईला कसे विसरतील? जनाबाई सावलीसारखी आयुष्यभर नामदेवाच्या पाठीशी उभी राहिली.
जगाचा अनुभव घ्यायला तीर्थयात्रेला जा, असं नामदेव-ज्ञानदेवांना सांगणारी जनाबाईच होती. नामदेवांनी जोडलेल्या सर्व जातीतल्या संतांचा, त्यांच्या कार्याचा यथायोग्य परिचय करून देणारी जनाबाईच होती. तिथं खरं मूल्यमापन संत कबीरांनी केलंय. ते आपल्या दोह्यांमध्ये म्हणतात, ‘जनी सब संतोंकी काशी’. म्हणजे हिंदु धर्मात जसं काशी क्षेत्राचं महत्व, तेच संतमेळ्यात जनाबाईचं!
जनाबाईला सर्व पद्धतीचं मोठेपण देणारे, कुटुंबातल्या स्त्रियांना लिहितं करणारे नामदेव स्त्रीमुक्तीचे आद्य जनकच.
तर मुद्दा होता नामदेवांच्या प्रतिज्ञेचा. व्यावहारीक अर्थानं एका जन्मात एकट्या नामदेवांनी शतकोटी अभंगरचना करणं अशक्यच होतं. पण या संकल्पनेचा व्यापक अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे. नामदेवांनी कुटुंबातल्या सर्वांना लिहायला लावलं. प्रत्येक जातीतून संत निर्माण केलं. त्यांना लिहायला लावलं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना लिहितं केलं. त्यांनी शेजारपाजा-यांना लिहायला लावलं. नामदेव हे केवळ महाराष्ट्रातच करून थांबले नाहीत. तर ते दक्षिण भारतात गेले. उत्तर भारतात गेले. तिथं अनेक संत निर्माण केले. त्यांना लिहितं केलं. ज्ञात अज्ञात कितीतरी लोक नामदेवांच्या प्रेरणेनं लिहिते झाले. सुमारे तीनशे वर्षांनी प्रतिकूल दुष्काळी परिस्थितीत मावळातल्या देहू गावच्या एका वाण्याला नामदेवांनी प्रेरणा दिली. त्यांचं नाव संत तुकाराम. ते म्हणतात,
नामदेवे केले स्वप्नामाजी जागे। सवे पांडुरंगे येऊनिया॥
सांगित
ले काम करावे कवित्व। वाउगे निमित्त बोलू नको॥
माप टाकी सल धरिला विठ्ठले। थापटोनि केले सावधान॥
प्रमाणाची संख्या सागे शतकोटी। उरले शेवटी लावी तुका॥
आज शेकडो वर्षांनीही तुकारामांचे अभंग गोरगरीबांच्या झोपड्यांमधून गायले जातात. तुकारामांच्या हयातीतच त्यांचे अभंग बुडवण्याचा प्रकार घडला. मला वाटतं तुकोबा त्या प्रकारावर छदमीपणे हसले असणार. आवलीला म्हटले असणार, ‘येडे लोक कुठले. यांना काय कळतंय़, ते नामदेवरायांचे ‘अभंग’ आहेत. त्यांना भंग नाही. ते बुडणार नाहीत, भिजणार नाहीत. त्यांना वाळवी, कसर लागणार नाही. पाऊस पडल्यावर माळरानावर कोवळं गवत जसं तरारून येतं, तसे हे अभंग जनताजनार्दनात आपोआप उगवून येतील. ज्यांना बुडवायचेत त्यांना बुडवू दे...’ ही सगळी जादू नामदेवारायांनी शोधलेल्या अभंग छंदाची. त्यांची शतकोटी अभंगांची प्रतिज्ञा तर केव्हाच पूर्ण झालीय. अजूनही घरोघरी, गावोगावी, चौकाचौकात सप्ताह होतात, भजनं होतात. विविध देवदेवतांच्या आरत्या होतात, त्यात नामदेवांचं स्मरण हमखास होतं. ‘केशवासी नामदेव भावे ओवाळती’ म्हणताना शेकडो हजारोंचा समूह नामदेवच झालेला असतो. ‘घालीन लोटांगण’ म्हणताना नामदेवाशी एकरुप होऊन स्वत:भोवती गिरकी घेतो.
नव्हे एकल्याचा खेळ  
तर त्या प्रसिद्ध ‘शतकोटी’च्या प्रतिज्ञेनंतर नामदेवांनी वारकरी पंथाच्या प्रसारासाठी कंबर कसली. पण तो काही एकल्याचा खेळ नव्हता. आपली कामं धामं सांभाळून पंढरपूरला येणारे अठरापगड जातीतले वारकरी नामदेवांनी जोडले. एकेक वारकरी म्हणजे त्या त्या गावाचा, त्या त्या समाजाचा प्रतिनिधीच. वरती उल्लेख केलेल्या सर्व धर्म, पंथातल्या चांगल्या म्हणून जेवढ्या गोष्टी होत्या, त्या नामदेवांनी वारकरी पंथात आणल्या. रुजवल्या. मग तो जातीभेद निर्मूलनाचा विचार असो की स्त्रीस्वातंत्र्याचा.
आता नामदेवांना गरज वाटत होती एका समविचारी, उमद्या, उत्साही दोस्ताची. तो त्यांना सापडला. आळंदीला. इंद्रायणीच्या काठी बसून लोकांना त्यांच्याच भाषेत, मराठीत भगवदगीता सोपी करून सांगत होता. देवाचं नुसतं नाव घेतलं तरी देव पावतो, असं सांगणा-या नामदेवांना आपला सखाच सापडला. संत ज्ञानदेव! संतमेळ्याला घेऊन ते आळंदीला पोहोचले. उराउरी भेट झाली. चर्चा, विचारविनिमय झाला. एक ‘लाँगलाईफ प्लॅन’ ठरला. विविध पंथांनी रुजवलेला समतेच्या विचारांचा झरा स्वच्छ करायचा. नवविचारांची जोड देऊन त्याला पुन्हा खळाळू द्यायचा. नामदेवांकडं माणसं जोडण्याचं कौशल्य होतं. सतत लोकांमध्ये राहिल्यानं लेखणीतही लोकवाणी उतरलेली. वाणी रसाळ. आवाज गोड. अभंग आणि कीर्तनातून त्यांनी हे सारं कौशल्य चपखलपणानं वापरलं. नामदेवांचं कीर्तन म्हणजे आनंदसोहळाच. मोठी गर्दी गोळा व्हायची. शिवाय हे कीर्तन थेट चंद्रभागेच्या खुल्या वाळवंटात. कुणीही यावं. सहभागी व्हावं. हातानं टाळ्या वाजवाव्यात. मुखानं देवाचं नाव घ्यावं. एवढं सोपं. त्या काळातला प्रभावी मीडियाच तो. (वारकरी संगीत तर नामदेवांनी केवढं समृद्ध करून ठेवलंय. देशभरातल्या भ्रमंतीतून वेगवेगळ्या प्रदेशातलं संगीत आत्मसात करून ते महाराष्ट्रात आणलं. दक्षिणेतून टाळ, वीणा, मृदुंग, आणले. राजस्थानातून चिपळ्या आणल्या. पंजाबातून ताल धरायला लावणारा ठायी धुमाळी ताल आणला.)
चर्चेतून ठरलं. नामदेवानं आपलं हे ‘स्कील’ पुरेपूर वापरून घ्यावं. मरगळलेल्या सर्व पंथांचं सहकार्य घ्यावं. देशभर फिरावं. नामदेवांची भेट सफल झाली. यासाठीच तर ते आळंदीत आले होते. ज्ञानदेवादी भावंडांना जोडून घेणं हेच नामदेवांच्या दृष्टीनं फार फार महत्त्वाचं होतं. कारण ही भावंडं होती नाथपंथी परंपरेतली. नाथपंथ पूर्ण देशभर पसरलेला पंथ. जनतेवर त्यांचा मोठा प्रभाव. गोरक्षनाथ त्यांचे प्रेरणास्थान. देशाटनाला गेल्यावर याच नाथपंथीयांची मदत होणार होती.
या भेटीत असं ठरलं की, नामदेवांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजे नरसीला जावं. तिथून जवळ असलेल्या त्यांच्या कुलदैवताला म्हणजे औंढ्या नागनाथाला जावं. औंढ्या नागनाथ हे शैवसंप्रदायाचं मोठं ठाणं. समतेचं एवढं मोठं कार्य करायला निघालोत तर सर्वात मोठ्या पंथाला, शैवांना सोबत घ्यायला हवं. त्यांच्याशी अकारण स्पर्धा, वितुष्ट नको. कारण त्यावेळी शैव-वैष्णवांचा वाद प्रसिद्ध होता. एकमेकांचं तोंडही पाहायचे नाहीत. तिथं होता, विसोबा खेचर नावाचा विक्षिप्त, खडूस म्हातारा. पण मोठा ज्ञानी. शैवसंप्रदायाचे लोक त्याला फार मानायचे. नामदेवांनी मिठास वाणीनं त्याला आपलंसं करून घ्यावं. या भेटीची होईल तेवढी चर्चा होऊ द्यावी. त्यामुळं शैव आणि वैष्णव पंथीयांमध्ये ऐक्याचा संदेश जाईल. विसोबा हे सोपानदेव, मुक्ताईचे शिष्य. त्यामुळं नाथपंथीयही सुखावले जातील. आणि विसोबांचे अनुभवाचे चार बोल येतीलच की कामाला. ठरलं तसंच झालं. विसोबांशी नामदेवाचं सख्य झालं. चमत्कारांचा मीठमसाला लावून या घटनेची प्रसिद्धी झाली. परिणामी नरहरी सोनारासारखे कट्टर शिवभक्त नामदेवांना येऊन मिळाले.
त्यानंतर अठरापगड जातीच्या संतांच्या माध्यमातून नामदेवांनी आपला समतेचा विचार महाराष्ट्रभर पसरवला. महानुभव पंथीयांशीही त्यांनी जुळवून घेतलं. ब्राम्हणांपासून शूद्रांपर्यंत सर्वांनाच आपल्या पंथात सामावून घेतलं. अगदी मुस्लिम समाजातूनही संत तयार केले. त्यांना आपल्या सोबत घेतलं. समन्वयाची संस्कृती खोलवर रुजवली.
गरज देश सावरण्याची
घर तर सावरलं होतं. आता गरज होती ती देश सावरायची. महाराष्ट्रातला यशस्वी अनुभव पाठीशी  होताच. नामदेव, ज्ञानदेव अठरापगड जातीतल्या संताना टीमला घेऊन तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा हे निमित्त. देश फिरायचा होता. संस्कृतीची शिलाई कुठं कुठं उसवलीय त्याचं निरीक्षण करायचं होतं. समाजमनाच्या दुख-या नसा तपासायच्या होत्या. यानिमित्तानं या दोघाही महापुरुषांनी समाजाची दुखं जाणली. त्यावर काय औषध करायचं हे नक्की झालं. महाराष्ट्राप्रमाणं केवळ विठ्ठल मूर्तीची पूजा नाही, तर चराचरात सामावलेल्या निर्गुणभक्तीचा पुरस्कार करायचं ठरलं. तीर्थयात्रेवरून आल्यावर नामदेव पुन्हा आपल्या कुळदैवताचं, औंढ्या नागनाथाचं दर्शन घ्यायला आले. एव्हाना ते महाराष्ट्रमान्य नव्हे देशमान्य संत झाले होते. सोपी नामभक्ती सांगत सामान्य लोकांच्या गळ्यातला ताईत झाले होते. त्यांचं कीर्तन गर्दीचा उच्चांक गाठत होती. 
खरा आत्मसाक्षात्कार
दिवस शिवरात्रीचा होता. नागानाथाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. पूजाअर्चा, होमहवन, अभिषेक, अनुष्ठानं सुरू होती. नामदेवांनीही सोबत्यांसह नागनाथांचं दर्शन घेतलं. त्या जनसमुदायासमोर, देवळासमोर कीर्तन करायचं नामदेवांनी ठरवलं. देशभर फिरून पाहिलेली परिस्थिती नामदेवांना श्रोत्यांना सांगायची होती. आपला नाममहिमाच कसा श्रेष्ठ आहे, हा अनुभव श्रोत्यांना सांगायचा होता. पण एवढे दिवस चाललेलं नामदेवाचं हे काम देवाच्या दलालांच्या पोटावरच पाय देणारं होतं. त्यांच्या कर्मकाडांची दुकानं बंद करणारं होतं. बरेच दिवस ते वाट पाहत होते ती संधी त्यांना मिळाली. नामदेव त्यांना आयतेच सापडले. नामदेवांच्या कीर्तनाला लोटलेली गर्दी त्यांच्या अगदी डोक्यात गेली. ही बहुजन, शूद्रांची गर्दी टाळून त्यांना सोवळ्यानं आत जाता येईना. साहजिकच नामदेवांना कीर्तन बंद करायला भाग पाडण्यात आलं. वर ‘‘नामदेवा, तू शूद्र आहेस. वेद आणि ब्राम्हणविद्या तुला काय ठाऊक. ही आम्हा महाजनांची जागा आहे. तुझा आम्हाला, आमच्या देवाला विटाळ होतो. इथून चालता हो…’’ नामदेवही वाद न घालता सरळ देवळाच्या मागे गेले. तिथं कीर्तन करू लागले. त्यांच्यासोबत आख्खा समुदाय देवळामागं गेला. नामदेवांच्या अपमानाची ही कथा सर्वत्र पसरली. कर्मठ पुजा-यांच्या विरोधात आख्खं समाजमनच फिरलं. नामदेवासाठी ‘नागनाथाचं देऊळ फिरलं’, अशी चमत्कार कथा मग तयार झाली. खरं तर हा प्रसंग म्हणजे नामदेव चरित्रातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा. नामदेवांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. नामदेवांना आत्मसाक्षात्कार देणारा. पुढच्या मानवी कार्याची प्रेरणा देणारा. या प्रसंगानं नामदेव दुखी-कष्टी झाले. अंतर्मुख झाले.
नागनाथे विन्मुख होऊनी पाठ दिधली हरिकीर्तनी।
काय
 अपराध झाला घडोनी। मजकडोनी कळेना।।
असा विचार करणारे नामदेव शेवटी आपण कितीही ज्ञानी झालो, मोठे झालो तरी शेवटी आपली जात काढली गेलीच, या विचारानं ते अस्वस्थ झाले. हा प्रसंग ते पुढच्या आयुष्यात कधीही विसरू शकले नाहीत. अगदी वीस वर्षाच्या पंजाबच्या वास्तव्यातही त्यांना या प्रसंगाचे कढ येत होते.
आलम दुनी आवत मै देषी साइर पांडे कोपिला हो।
सुद्र
 सुद्र करि मारि उठायोकहा करौ रे बाबुला हो।।
किंवा
उठि रे नामदेव बाहरि जाइ। जहां लोग महाजन बैठे आइ।।
बांभण
 बणीया उत्तिम लोग। नहीं रे नामदेव तेरा जोग।।
किंवा
हीन-दीन जात मोरी पंढरीके राया। ऐसा तुने दरजी कायके बनाया।।
टाल
 बिना लेकर नामा राऊल मे गया। पूजा करते बहमन उनैन बाहेर ढकाया।।
अर्थात या अभंगांचा उपयोग त्यांनी उत्तर भारतातील बहुजनांच्या जागृतीसाठी केला. मानहानीचं जीणं जगणा-या शूद्र समाजाला नामदेवांच्या या अनुभवकथानामुळं आत्मभान मिळालं. त्यांचा न्यूनगंड नाहिसा झाला.
संतमांदियाळीचा प्रेरक
नामदेवांनी महाराष्ट्रात सर्वजातीच्या संताचं मंडळच उभं कलं होतं. संत चोखामेळा, जनाबाई या शूद्रातीशूद्र समाजातल्या संतांना मोठं केलं होतं. त्यांना अभंग लिहायला प्रवृत्त केलं होतं. तेच कार्य त्यांनी पंजाबात केलं. आधार नसलेल्या एका विधवा स्त्रीचा मुलगा बोहरदास त्यांचा पहिला पट्टशिष्य झाला. सुतारकाम करणारा जल्लो, खत्री जातीचा लद्धा, महारोग झालेला खत्री समाजाचाच केशो, ज्याची त्यांनी सेवा करून त्याला बरा केला.
रामानंद, कबीर, सैन, रोहिदास, त्रिलोचन, जयदेव, सधना, धन्ना जाट, पीपा, परमानंद, नानक, सूरदास, मीराबाई, नरसी मेहता या समाज घडवणा-या उत्तर भारतातल्या संतांना नामदेवांपासूनच प्रेरणा मिळाली. महत्वाचं म्हणजे या संतांना येणा-या स्थानिक भाषेतूनच बिनदिक्कतपणे लिहिण्याची प्रेरणाही नामदेवांनीच दिली. शिवाय स्वत: हिंदीतून रचना लिहून तिथल्या भाषेशी नाळ जोडली.
नामदेवांच्या या कर्तृत्वाचं त्यांच्या मायभूमीनं, महाराष्ट्रानं योग्य मूल्यमापन केलं नाही. लाखालाखांचे दहीहंडी उत्सव करणा-यांना हा गोपाळकाल्याचा उत्सव नामदेवरायांनी सुरू केला याचाही तपास नाही. कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांच्या रुपानं नामदेवांनी मराठीत पहिल्यांदाच किती सुंदर बालसाहित्य लिहिलंय त्याचीही दखल अजून कुणी घेतलेली नाही.
महाराष्ट्रधर्माचा उदगाता
‘महाराष्ट्रधर्म’ संत रामदासांनी सांगितला असं सांगितलं जातं. ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र नेमाडे, कॉम्रेड शरद पाटील महाराष्ट्रधर्माचा पाया परदेशातून आलेल्या मलिकांबर या निजामी सरदारानं घातला असं सांगतात. पण समतेचा, ऐक्याचा पाया महाराष्ट्रात भक्कम करून उत्तर भारतातही हा अस्मितेचा, बंधुभावाचा झेंडा नेणारे नामदेवच महाराष्ट्र धर्माचे खरे उदगाते आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. नामदेव केवळ महाराष्ट्रपुरुष नव्हेत तर राष्ट्रपुरुष आहेत. परकीय आक्रमण थोपवण्यासाठी उत्तर भारतात जाऊन हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणणारे ऐतिहासिक पुरुष आहेत.
राजधानी दिल्ली ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणारे सर्व आक्रमक पहिल्यांदा सुपिक, सधन पंजाबवर आक्रमण करत. त्यामुळं पंजाबी माणूस हतबल झाला होता. जग जिंकणा-या सिकंदरालाही पंजाबचं पाणी दाखवणा-या पंजाबी माणसाला नामदेवांनी पुन्हा उभं केलं. लढायला शिकवलं. लढवय्या शीख धर्माचा पायाच त्यांनी घातला. म्हणूनच तर आजही देशाच्या कानाकोप-यातून नामदेवरायांच्या टाळमृदुंगाचा गजर ऐकू येतोय. तो मनोभावे ऐकावा. नामदेव आठवावा. मनात रुजवावा. आत्मसाक्षात्काराचा पिंपळ नव्या पालवीनं सळसळून यावा.
बोला पुंडलिक वर दे...

Monday, July 23, 2012

बळीराजा शेतकऱ्यांचा राजा

 
बळीराजा  शेतकऱ्यांचा राजा
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.
बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन-परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.
बाहेरून आलेल्या परकीय आर्यभटाने कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकावले. तेव्हापासून आपण सर्व दुःखात आहोत. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन (विष्णूचा अवतार ?) याने बळीराजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात. कालेलकर आयोग, मंडल आयोग आदी आपल्या फायद्याचे आयोग हे आर्यभट आजही दडपून टाकत आहे. आज या बळीराजाचे रूप असलेल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. या आर्यामुळे देशात जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता, आर्थिक शोषण या सर्व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हे सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेवून सांस्कृतिक संघर्ष करावा लागेल. म्हणून आज बळीपूजनाच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करुया व बळीराष्ट्राच्या निर्मितीचा निर्धार करुया.बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासाचा धसका जातीयवाद्यांच्या छातीत कायमचा घर करून बसलेला असल्याने जेव्हा जेव्हा बळीराजा पाताळातून वर येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा त्याला पुन्हा पाताळात गाडण्यासाठी प्रयत्न सुरु करतो. प्रत्येक दसऱ्याला जातीयवादी आर्य लोक कणकेचा बळीराजा बनवून ठार मारतात. हे कर्मकांड झाले, परंतु या कर्मकांडाला आधुनिक संदर्भ देवून तो वर्तमानातील संभाव्य बळीराजांना सतत पाताळात गाडण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कालेलकर आयोग, मंडल आयोग गाडणे म्हणजे वर्तमानातील संभाव्य बळीराजांना गाडणे होय. आज ज्याला बळीराजा म्हंटले जाते ते शेतकरी दररोज हजारोंच्या संख्येने आत्महत्या करीत आहेत. इतिहासातील बळीराजा हा आर्य आक्रमकांविरुद्ध लढता-लढता मेला. आजचा बळीराजा लढण्याऐवजी मरणेच पसंद करतो आहे. लढाई सुरु करण्याआधीच तो पराभव मान्य करतो आहे. त्याची लढण्याची प्रेरणाच हरवली आहे, कारण त्याचा क्रांतिकारक लढ्याचा इतिहास हरवला आहे. त्याची लढाऊ ओळख हरवली आहे. म्हणून आज बहुजन बुद्धीजीविनी ब्राम्हणी इतिहासाला पुसून काढण्यासाठी खरा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले पाहिजे. हा इतिहास ब्राम्हणी साहित्यात शोधण्याऐवजी बहुजनांच्या रुढी व परंपरांमध्ये शोधला पाहिजे. त्यावरील अंधश्रद्धांची पुटे खुरटून काढलीत तर अस्सल इतिहास आपणाला सापडल्याशिवाय राहत नाही. बहुजनांच्या डोक्यातून अंधश्रद्धा नष्ट करावयाच्या असतील तर त्यांचे देव फेकून उपयोग नाही. तर त्यांच्या देवाचा अभ्यास करून त्यामागील क्रांतिकारक इतिहास शोधून काढला पाहिजे. तरच बहुजन माणूस आपल्या देव्हाऱ्यातील दगडांना देव न मानता केवळ ऐतिहासिक महापुरुष म्हणून मान्यता देईल व त्यांची पूजा करण्याऐवजी त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेईल. यासाठी प्राचीन काळापासूनच्या सर्व रुढी, परंपरा व दगडांच्या देवांच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. त्याशिवाय जातीयवाद्यांनी लादलेल्या रुढी, परंपरा दगडाचे देव आणि बहुजनांचे खरेखुरे ऐतिहासिक देव यातील फरक कळणार नाही. हा फरक ज्या दिवशी बहुजनांना समजेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आर्य ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुरु होईल. इतिहास लिहिण्याची प्रथा फार अलीकडची असल्याने मानव समाजाने आपला इतिहास मिथके आणि रुढी, परंपरांच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. शासक-शोषक प्रस्थापितांना आपली व्यवस्था कायम ठेवण्याच्या दृष्टीने एकतर या रुढी, परंपरा मदत करतात किंवा ज्या मिथके परंपरा व्यवस्थेच्या विरोधी आहेत त्या विकृत करण्याचा वा दडपण्याचा ते प्रयत्न करतात. शोषित-शासित विस्थापितांच्या बुद्धीजीवी वर्गाला या व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणा याच विकृत केलेल्या इतिहासातून शोधाव्या लागतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, “ब्राम्हणांनी वर्ण जातीव्यवस्था कशी असावी याबाबत भरपूर भाकडकथा लिहिल्या, परंतु ही व्यवस्था अक्षी अस्तित्वात आली हे मात्र लिहून ठेवले नाही, ते जर लिहून ठेवले असते तर ही व्यवस्था नष्ट करणे सहज सोपे झाले असते.”
भारतीय समाजच्या जडणघडणीचा इतिहास वारंवार विकृत करण्याच्या एकतर्फी प्रयत्नामुळे व खोटा इतिहास रूढ केल्यामुळे आज वर्णव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करताना खूप अडचणी येत आहेत. त्यातीलच सर्वात मोठी अडचण म्हणजे Identity ची ! त्याशिवाय संघर्ष उभाच राहू शकत नाही. आपण कोण ? आपले शत्रू कोण ? हे समजल्याशिवाय व्यवस्था समजत नाही व त्या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा राहू शकत नाही. याउलट वर्ण-जाती समर्थक बुद्धीजीविनी ब्राम्हणी अन्वेषण पद्धतीने इतिहास लिहून तो रूढ केला. त्यामुळे ब्राम्हण हे परकीय नसून आपलेच भारतीय व धर्मबंधू असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. आर्यांनी आपली Identity पुसून भारतातीलच मूळ असलेली ब्राम्हण (ब्रम्हण) हीIdentity स्वीकारली. त्यामुळे त्यांना ब्राम्हणी वर्चस्वाची वर्ण-जातीव्यवस्था सहज निर्माण करता आली व लादता आली.
आज आपण ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा अनेक Identities घेवून वर्ण-जातिव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. परंतु या संघर्षासाठी आवश्यक असलेली कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातींची व ओबीसींची फौज तुमची कोणतीही Identity घेवून लढायला तयार नाही. मुस्लीमद्वेषाचा ब्राम्हणी इतिहास अधिकृत असल्याने त्यांनी आपली Identity हिंदू म्हणून स्वीकारणे स्वाभाविक आहे. या देशातील ओबीसी, जनता “हिंदू Identity” घेवून मुस्लिमांच्या विरोधात लढू शकते, उच्चवर्णीयांच्या विरोधात नाही. कोणत्याही सामाजिक व सांस्कृतिक संघर्षात Identity हा कळीचा मुद्दा आहे. ही Identity इतिहासातून येते. त्यातूनच लढण्याची प्रेरणा मिळते. वर्तमानकाळ फक्त लढ्याची साधने, धोरणे व डावपेच ठरवत असतो. सत्य इतिहास, अचूक Identity व प्रेरणा ही शस्त्रे नसल्यास सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष उभा राहूच शकत नाही. पाच हजार वर्षांपासून भरण-पोषण होत असलेली वर्ण-जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक व सांकृतिक संघर्षाशिवाय पर्यायच नाही.
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फूले यांनी बळीराजाचे जे प्रतिक आपणास दिले आहे, त्याच्या मुळाशी सांस्कृतिक संघार्षाचीच पार्श्वभूमी आहे. परंतु या दृष्टीकोनातून बळीराजाचा अभ्यास अजून व्हावयाचा आहे. तात्यासाहेबांनी सिद्ध केलेला द्वंदात्मक ऐतिहासिक भौतिकवादातून वर्णजातिव्यवस्थेच्या संघर्षाची जी मांडणी केली त्याची सुरुवात बळीराजापासून होते. सर्व मांडणी पुढ्यात ठेवलेली असतानाही बहुजन बुद्धीजीविना बळीराजाचे सांस्कृतिक महत्व फारसे लक्षात आले नाही. परंतु ग्रामीण भागातील बहुजन अडाण्यांना बळीराजाचे महत्व कळते आणि म्हणूनच पाच हजार वर्षापासूनच्या ब्राम्हणी विरोधाला न जुमानता त्यांनी आजही बळीराजाचा इतिहास जिवंत ठेवला आहे. या लढ्यात अग्रभागी आहेत ग्रामीण स्त्रिया, ज्या आजही ब्राम्हणी इडापीडा घालण्यासाठी बळीच्या राज्याची आस जिवंत ठेवत आहेत. कोण होता हा बळीराजा ? दसऱ्याच्या दिवशी बळीराजाचा कपटाने खून झाला. परकीय आर्य वामनाने व त्याच्या सैन्याने या दिवशी बळीच्या प्रजेला प्रचंड लुटले. सोने, चांदी, धन-धान्य सर्वस्व लुटले. तो आपल्याला २१ दिवसांनी भेटायला येणार आहे. दसऱ्यानंतरचा २१ वा दिवस म्हणजे प्रतिपदा ! या दिवशी बळीराजा आपल्या दुखी व कष्टी प्रजेला भेटायला येतो. प्रजा आपले सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदाने आपल्या राजाचे स्वागत करते. नावे कपडे, मिठाई, फटाके, रोषणाई अशा जल्लोषात बळीराजाचे स्वागत होत असते. प्रत्येक युगात आपल्या शेतकरी, कष्टकऱ्यांना ब्राम्हणी पिदेतून मुक्त करण्यासाठी बळीराजा नवे रूप, नवे नाव व नवे तत्वज्ञान घेवून जन्माला येत असतो. बुद्ध, शिवाजी, फूले, शाहू, आंबेडकर, पेरियार, वि.पी. सिंग, कांशीराम हे बळीराजाचेच कार्य पुढे नेण्यासाठी झिजले. परंतु त्यांच्या क्रांतिकार्यात अडथळे आणण्यासाठी नवे वामनही जन्म घेत असतात. हा केवळ दोन व्यक्तींमधला संघर्ष नाही. विषमतावादी विरुद्ध समतावादी अशा दोन व्यवस्थेमधला हा संघर्ष आहे. स्वामी विरुद्ध गुलाम, जमीनदार विरुद्ध कुळ, भांडवलदार विरुद्ध कामगार, ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हणेतर असे अनेक प्रकारचे संघर्ष प्रत्येक युगात झाले आहेत व होत आहेत. प्राचीन काळी वामनानी कर्मकांड, अंधश्रद्धा, पोथी-पुराणे अशी हत्यारे वापरली. त्यात आता मंदिर-मशीद वाद, जातीय दंगली, सेज अशा नव्या हत्यारांची भर पडली आहे. आता प्रत्येक कष्टकऱ्याने रणमैदानात उतरले पाहिजे. बळीपुजनानिमित्त आज बळीराजाची स्मृती जागवूया ! त्याच्या पराक्रमापासून प्रेरणा घेवून समाजातील जाती-वर्ण व स्त्री-पुरुष विषमतेविरुद्ध लढूया !
जय बळीराष्ट्र ! बळीराजा चिरायू होवो !

Saturday, July 14, 2012

छत्रपती घराणे...


छत्रपती घराणे...!!!

छत्रपती घराणे...!!!

कशास हवा तुम्हा सिकंदर ,अन कशास हवा कोलंबस !
अरे छत्रपतीला स्मरा एकदाशिव छत्रपतीला स्मरा एकदा,
अन बघा तुम्हीच कि हो सिकंदरअन तुम्हीच हो कोलंबस !
ज्यांच्या इतिहासाची पाने उलटतांना अंगावर काटा उभा राहतोज्यांच्या अवघ्या नामघोषाने अंगामध्ये रक्त सळसळतेज्यांच्या विचारांनी देखील एक नव चैतन्य प्राप्त होते असेतमाम मराठी मनाचा मानबिंदूसह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्षे तळपणारा क्रांतिसूर्यराष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांनी स्वराज्याला अर्पण केलेले युगपुरुष, मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. 
        
चला तर मग या  वंदनीय छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या छत्रपती घराण्याची धावती भेट घेवूया.


छत्रपती घराणे...!!!
चित्र:Shivaji Maharaj Rajmudra.jpg


बाबाजी भोसले (जन्म १५३३) (वेरुळचे पाटील भोसले.)
त्यांचे प्रथम पुत्रः- मालोजी भोसले, त्यांची पत्नी उमाबाइ ह्या फलटणच्या नाईक-निम्बाळकर यांच्या कन्या.
द्वितीय पुत्रः- विठोजी ,पत्नी आउ बाइ. याना ८ पुत्र आणि १ कन्या.
(अम्बिकाबाइ १ .सम्भाजी २.खेलोजी ३ .मालोजी ४ .कबाजी ५.नागोजी ६ .परसोजी ७.त्रिम्बकजी ८. ककाजी)

मालोजी भोसले(१५४२-१६१९)
पुत्र
१.शहाजी - पत्नी- जिजाबाई (सिन्दखेडचे लखुजी जाधव यांची कन्या. सिन्दखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे (जाधवांचे !)वंशज)
२.शरीफजी -पत्नी दुर्गाबाई. शरीफजी नगरच्या जवळच्या प्रसिद्ध भातवडीच्या लढाईत मारले गेले.

शाहाजी भोसले (१५९४-१६६४)
शाहाजी अहमदनगरच्या निजामशाहीत नन्तर विजापूरच्या आदिलशाहीत सरदार होते. सुरुवातीस नगरची निजामशाही मोगलापासून वाचवण्यासाठी निजामाचा वजीर मलिकम्बरला बरोबर घेऊन मोगलांचा व विजापूरकरांचा पराभव केला.(भातवडीची लढाईं. नगरपासून १५-२० किमी.). भातवडीच्या लढाईत सासरे लखूजी जाधव विरोधात मोगलांच्या बाजूने लढत होते.!!
शाहाजी नन्तर विजापूर दरबारी गेले. कर्नाटकात गेले. तिकडेच निधन झाले.
शाहाजी भोसले -- 
पत्नी १. - जिजाबाई -
पुत्र १. संभाजी (१६२३), २. छत्रपती शिवाजी महाराज ! 
पत्नी २. - तुकाबाई - पुत्र व्यंकोजी उर्फ एकोजी राजे (तंजावर शाखा )
पत्नी ३. -  नरसाबाई - पुत्र-संताजी.

छत्रपती शिवाजी महाराज
पत्नी १. सगुणाबाई (शिर्के घराणे ), कन्या-- राजकुवर (गणोजी शिर्के यांची पत्नी.)
पत्नी २. सईबाई (नाईक निम्बाळकर यांची कन्या), पुत्र  संभाजी,   कन्या- सखूबाई व इतर २
पत्नी ३.सोयराबाई(हंबीर राव मोहितेंची बहीण), पुत्र  - राजाराम, कन्या- बळीबाई
पत्नी ४.पुतळाबाई (मोहिते घराणे)
पत्नी ५. लक्ष्मीबाइ (विचारे)
पत्नी ६.सकवारबाई (गायकवाड ), कन्या -कमळाबाई
पत्नी ७.काशीबाई ( जाधव घराणे)
पत्नी ८. गुणवन्ताबाई (इंगळे यांची कन्या)

धर्मवीर छ. संभाजी  महाराज - (१६५७-१६८९)
मातोश्री - सईबाई, पत्नी - येसूबाई, पुत्र --शाहू (१६८२-१७४९) -
संभाजी महाराजांचा वध झाल्यावर येसूबाई व ७ वर्षाचा शाहू मोगलानी कैद केले. १८ वर्षे म्हणजे औरंगजेब मरेपर्यन्त शाहू कैदेत होता. औरंग्जेब मेल्यावर त्याच्या मुलाने शाहू ला मुक्त केले. तोपर्यंत सोयराबाईचे चिरंजीव व सम्भाजीचे सावत्र भाऊ राजाराम राजे झाले . पुढे औरंग्जेबाच्या त्रासाला कंटाळून राजारामाने जिंजी गाठली व रामचन्द्र अमात्य यांच्या साह्याने मराठेशाही चालवली. राजारामाची पत्नी ताराबाइ हिने सातारा गादी ताब्यात घेतली. पुढे शाहू सुटून आल्यावर शाहू व ताराबाईची लढाई झाली. शाहूने विजय मिळवून सातारा गादी ताब्यात घेतली. व ताराबाईने पन्हाळ्याकडे प्रस्थान केले.

शाहू महाराज - 
मातोश्री - येसूबाइ , 
पत्नी - १. सकवारबाई, २. सगुणाबाई.  (शाहू निपुत्रिक होते)

छ. राजाराम - 
मातोश्री :- सोयराबाई,
पत्नी - १. ताराबाई (१६७५-१७६१), पुत्र - शिवाजी(१६९६-१७२६)
२.जानकीबाई
३.राजसबाई - पुत्र सम्भाजी(१६९८-१७६०)
४.अम्बिकाबाई (सती गेली)
५. सगुणाबाई
राजारामाचा महाराजांचा मृत्यु १७०० मध्ये सिंहगडावर झाला.  त्यानन्तरही ताराबाईने औरंगजेब मरेपर्यन्त त्याला झुंज देऊन मराठेशाही टिकवली. ताराबाई ८६ वर्षे जगली. पन दुर्दैवाने भाऊबन्दकीने स्वकीयांच्याच कैदेत तिचे बरेच आयुष्य(३५ वर्षे) गेले. सम्भाजी (सावत्रमुलगा) व राजसबाई यानी १७ वर्षे आणि शाहूने १८ वर्षे कैदेत ठेवले.  तर असे हे संक्षिप्तरुपात  छत्रपती घराणे...!!! 
        यापुढचे तुम्हा आम्हास माहीतच आहे.. सध्या छत्रपतींचे वारस काय करत आहेत ते... पण तुम्ही जर स्वताला शिवरायांचे वारस समजत असाल तर मग जमेल तेथे जमेल त्या मार्गाने समाजातील अनिष्ट चालीरीतीजातीभेदअज्ञानशासनातील किंवा इतर ठिकाणचा भ्रष्टाचार आणि एका प्रगत राष्ट्राला जे काही बाधक आहे त्या सगळ्याचा विरोध करू..!
         शेवटी स्वाभिमानाच्या सूर्यालापर्वतासारख्या खंबीर राजालाजिजाऊच्या सिंहाला आणि त्याच्या कर्तुत्वाला समस्त महाराष्ट्राचा मानाचा मुजरा...!!!

Thursday, July 12, 2012

भुलेश्वर


भुलेश्वर
---------------
देवगिरीकर यादव यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली, त्यातीलच भुलेश्वर हे एक यादवकालीन शिल्पवैभवाचा देखणा नमुना असलेले शिवमंदिर. पुरंदर तालुक्याच्या क-हापठावर सह्याद्रीच्या दोन पर्वतरांगा एकमेकाला संमातर अशा पुवर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. उत्तर दिशेच्या पर्वतरांगेवरील पुर्वेच्या टोकाला दौलतमंगळ किल्ला दिमाखात उभा आहे. याच किल्ल्यावर भुलेश्वर मंदिर आहे. पुरंदर तालुक्याचे शेवटचे टोक माळशिरस गाव असून, भुलेश्वरचे प्राचीन दिमाखदार वैभव पिढ्या न पिढ्या गावाने साभांळले. प्रत्येक माणसाच्या मनात या मंदिराची शिल्पकला आणि शंभुमहादेवाच्या प्रति मनात श्रद्धा आहे. 
 तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेवर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. गजनीच्या महंमदाने केलेल्या आक्रमणावेळी बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. महिनाभर यात्रा असते. परिसरातून मानाच्या कावडी येतात. चैत्री बारशीलाही मंदिरासमोर मानाच्या कावडी नाचवल्या जातात. ही जुनी परंरपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करुन यादवकालीन भुलेश्वर हे पु्स्तक लिहिले आहे.महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही आहे.
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत. 

या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता. नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. तुकोजी होळकर यांच्या काळात पुढील नगारखान्याचे बांधकाम झाले. 

मंदिराची रचना -मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग इतर मंदिरापेक्षा जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते. 
  कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.

दौलत मंगळगड- १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला बांधला, (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. जीर्णोद्धारामुळे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओव-या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्स्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वखात्याने ताब्यात घेतले असून राष्ट्रीय संरक्षक म्हणून जाहीर केले आहे. पुण्यापासून पन्नास किमी अंतर आहे. सासवड व यवतहूनही मंदिराकडे येण्यासाठी रस्ते आहेत. गडाच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यान गावाच्या गायरान जमिनीत उभे आहे. पायथ्याला मोठी वसाहत होती. त्याच्या खाणाखुणा आजही लक्षवेधून घेतात. ढासळलेली मसजिजदही लक्ष वेधून घेते. हिरव्यागर वनराईने नटलेला परिसर व शिल्पसौदर्यांचा अनोखा नजराना खिळवून ठेवतो.


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१

हे माहित आहे का मत्स्य पुराण

हे तुम्हाला माहित आहे का
--------------------------------

मत्स्य पुराण (७०) अध्याय
अनंगदान व्रत....
पुण्यवती स्त्रीयाना सदाचारणाचा धर्म धमर्मगुरुंनी सांगितला..ज्या रविवारी हस्त पुष्य़ व पुनर्वसू नक्षत्र येईल त्या दिवशी सि्त्रीने उत्तम प्रकारे स्नान करुन मदनाच्या नामांनी वि्ष्णूची सवार्वांग पुजा करावी. नंतर विद्वान ब्राम्हणांना बोलावून त्यांची पूजा करून एक शेर साळीचे तांदूळ घृतपत्रासह द्यावे. यथेष्ठ भोजन घातल्यावर तो साक्षात कामदेव मानून स्त्रीने देह त्याला अर्पण करावा. तो...याप्रमाणे तेरा महिने करावे. नंतर गादी, मच्छरदाणी वगेरे ऊपसाहि्त्याने युक्त शय्या त्या ब्राम्हणाला द्यावी. अलंकार द्यावे, लक्ष्मीसहित कामदेव नामक विष्णूची गुळाच्या कुंभावर स्थापलेली प्रतिमा बाम णला द्यावी. एक दुभती गाय देवून नंतरत्याला प्रदक्षिणा करुन निरोप द्यावा. हे व्रत घेतल्यापासून जो ब्राम्हण रतिसुखासाठी रविवारी घरी येईल त्याला सर्वभावे करून मानावे.....

मनुवादी संस्कृतीवर घणाघाती हल्ला करणारे सत्यशोधक दिनकराव जवळकर म्हणतात....देशाचे दुश्मन पान क्रमांक २४ मददर्द मराठ्या एक कोणता ब्राम्हणेत्तर आपली बायको दर रविवारी भटाच्या पलंगावर चढवायला तयार आहे ..ही पुराणे जाळायला जो ब्राम्णेत्तर तयार होत नाही तो अज्ञानी तरी असला पाहिजे नाही तर मत्स्य पुराणोक्त बायको देऊन स्वगर्ग जिंकणारा तरी असला पाहिजे...या पुराणाचे समथथर्थन करणारे टिळक चिपळूणकर ज्योतिरांवांनी विरोध केला म्हणून त्यांचा द्वेष केला...वे्श्यांनाही हाच धमर्म सांगून भटांनी बुधवारपेठ वसविली. गोव्यात तर शेसविधी करन जातच्या जातच वेश्या बनवली. वाचकहो असल्या पुराणाचा विचार करा...पुराणाची बाजू उचलणा-या भटाची मायबहीण शुद्राने अनंगदान देऊन पावन केली तर ते क्षम्यच नव्हे काय. उठ मदार्दा तुझ्या अब्रुवर या भटुड्यार्यानी पापदृष्टी ठेवली. सदाचार व धमामार्माच्या नावाखाली पूवर्वजांच्ा मायामाता भ्रष्ट केल्या त्या दुश्म भटुड्यार्याच्या धमरमर्मग्रथांना तू लाथेखाली तुडव नाही तर जाळणार नाही तर काय करणार......आजच्या भटांची हे सांगण्याची काय माय व्याली आहे का पण..आंधळ्या हिंदूमर्दा बायका ब्राम्हणांना देणे हा धमर्म आहे. विचार कर....

Wednesday, July 11, 2012

आठवण


आठवण

आठवण येते सखे
किती सोसू मी गं घाव
पंख लावी मन माझे
तुझ्याकडे घेते धाव

गुलाबाचे रान तुझे
काट्याची गं येते कीव
वाट तुझी पाहाताना
कासावीस होतो जीव

हरवून जातो कधी
आठवांच्या झुंबरात
शोध तुझा घेत घेत
उतरतो अंधारात

समजावता मनाला
वाटे हा आभास
ओठातून येती माझ्या
गोड गाणी ही उदास


तुझी ओढ बघ सखे
कशी छळते जीवाला
मुक्यानेच रडे मन
कधी कळणार तुला


दशरथ यादव, पुणे

शिवधर्मगाथा


                                                        शिवधर्मगाथा
                                              

                                            जिजाऊ शिवाचा। आहे जो बछडा।।
                                            तोचि रे फाकडा। शिवधर्मी।।१।।
                                            शिवधर्म मूळ। शिवबाचे कूळ।।
                                            जिजाऊ राऊळ। सिंदखेड।।२।।
                                           जात पात नाही। देवपूजा सोडा।।
                                           भटाची ना पिडा। औषधाला।।३।।
                                           सिंदखेड राजा। शिवधर्म पीठ।।
                                           चालू केली वाट। गौतमाची।।४।।
                                           आपुला तो आहे। खरा शिवधर्म।।
                                            पूर्वजांचे वर्म। कळो येई।।५।।
                                 
                                                         दशरथ यादव, पुणे