Popular Posts

Wednesday, July 11, 2012

आठवण


आठवण

आठवण येते सखे
किती सोसू मी गं घाव
पंख लावी मन माझे
तुझ्याकडे घेते धाव

गुलाबाचे रान तुझे
काट्याची गं येते कीव
वाट तुझी पाहाताना
कासावीस होतो जीव

हरवून जातो कधी
आठवांच्या झुंबरात
शोध तुझा घेत घेत
उतरतो अंधारात

समजावता मनाला
वाटे हा आभास
ओठातून येती माझ्या
गोड गाणी ही उदास


तुझी ओढ बघ सखे
कशी छळते जीवाला
मुक्यानेच रडे मन
कधी कळणार तुला


दशरथ यादव, पुणे

No comments: