Popular Posts

Saturday, July 7, 2012

वारकरी चळवळ धोक्याच्या वळणावर............


     
वारकरी चळवळ धोक्याच्या वळणावर............
--------------------------------------------
वारीच्या वाटेवर..........दशरथ यादव,पुणे  (संत साहित्याचे अभ्यासक)
----------------------------------------------------------------------
महाराष्टाचे आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा लोकदेव विठ्ठल आणि जेजुरीचा खंडोबा हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी माणसांच्या मनात या  दोन्ही लोकदेवाबाबत आदराचे स्थान आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त जसे वारी करतात तसे मल्हारी मातर्तंड खंडोबाचे भक्त न चुकता मल्हार वारी करतात. वारी म्हणजे येरझारा घालणे. आपल्या आवडत्या स्थळाला देवाला न चुकता जाणे. महाराष्ट्रात हजारोंवर्षापासून वेगवेगळया विचारांचे प्रवाह आहेत. एक प्रवाह स्वतःच्या स्वाथार्थासाठी समाजाला वेठीस धरणारा. तर दुसरा प्रवाह त्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करणारा. यातूनच सांस्कृतिक लढा उभारला गेला. आणि मग धर्म, पंथ, संघटना, गटतट उभे राहिले. समाजाचे सांस्कृतिक जीवनाशी नाळ घट्ट असल्याने याच सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रबोधनाचा लढा उभा राहिला. भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगाने मान्य केली. पण भारतात दोन मतप्रवाह असल्याने काहींनी टीका केली. अंजिठ्याची लेणी उजेडात आली आणि पुन्हा बुद्ध हसला. गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश सगळ्या जगाला प्रेरणा देत आहेत. हाच शांतीचा संदेश देणारा विचार प्रवाह शेकडो वर्षे बाजूला गेला होता. पण याच विचाराचा आधार घेत समाजात काही प्रमाणात प्रबोधनाचा जागर सुरू होता. याच प्रवाहाचा मोठा बोलबाला  पुन्हा एकदा भागवत धर्माची स्थापना करून संतानी हा प्रबोधनाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. आज वारीचे मराठी माणसांच्या मनातील स्थान पाहिल्यावर कळून येते. पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही बुद्धांची मूर्ती असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला लोकदेव मानून वारकरी संतानी गौतमाचा विचार समाजात रुजवला. भागवत धमार्माची नाळ ही बुद्ध विचारात आहे, हे सांगायाला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
हिंदू धमार्मातील चुकीची प्रथा, अंधश्रद्धा, जातीयता, देवाधमार्माच्या नावाखाली होणारा अमानुष प्रकार, मानसिक गुलामी याविरोधात बंड करून समाजसुधारक संतानी मनूस्मृतीचे कायदे मोडून काढीत नव्या पंथाची (धर्माची) स्थापना केली. त्यातून संत बसवेश्वराचा पंथ, संत चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, भागवत धर्म (वारकरी पंथ) व गुरुनानकांनी शीख पंथाची निर्मीती केली. हे सगळे धर्म हिंदूधमार्मातून बाहेर पडलेले आहेत. त्यांचे आचरण वेगळे, कायदे वेगळे व देवही वेगळे आहेत. हिंदू धर्मार्शी यांचा आता काही संबध नाही. पण अजूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही सनातनी वृतीचे लोक करीत असतात. काहींनी तर वारकरी संप्रदायात येऊन पुन्हा या संप्रदायाला मूळ उद्देशापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
वारकरी चळवळीचा    
केंद्रबिंदू सरकतो आहे
परिवर्तनाच्या पोटात
प्रतिगामी शिरतो आहे

चमत्काराची भाषा
कुणी वारीत करु नये
चुंबकाचा कस असा
वारीला लावू नये
वारकरी पंथाला चांगले दिवस आले ते राजारामदेवराय यादव यांच्या काळात. अकराव्या शतकात देशात चांगले दिवस होते. देवगिरीच्या यादवांची सत्ता महाराष्ट्र व देशाच्या अनेक भागात विस्तारली होती. यादवराजे धामिर्मिक व सहिष्णूवृत्तीचे होते. राज्य सुखसमाधान होते. संपत्तीचे गोकुळ वसले होते. दरम्यानच्या काळात संत बसवेश्वरांनी समाज जागृतीचे काम केले. संत चक्रधरस्वामींनी महानुभाव पंथ स्थापन करून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. याच काळात भागवत धमार्माची पताका खांद्यावर घेऊन संतनामदेवांनी वारकरी धर्म देशभर पोचवला. पंजाबात त्यांनी समाजात प्रबोधन केले. शीखांच्या गुरुबानीमध्ये संत नामदेवांचे ५२ अंभग आहेत. गुरुनानकांनीही परिवतर्तनासाठी शीख पंथ स्थापन केला. सगळ्या संत कवींनी समाजाचे प्रबोधनासाठी पंथ स्थापन करून समाज सुखी करण्यासाठी कष्ट घेतले. राजारामदेवराय यादव यांनी वारकरी पंथासाठी मोठी मदत केल्याचा उल्लेख पंढरपूरच्या शिलालेखात आहेत. हेमाडपंथी यादवकालीन शिल्पकलेची भव्यदिव्य आकाराची मंदिरे यादवांच्या काळात झाली. कोट्यावधी रुपये त्याकाळात खचीर्ची झाले. यावरुन यादवांच्या राज्यात गोकुळ नांदत होते हे स्पष्टपणे लक्षात येते.
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत राजारामदेवराय यादवांच्या कारभाराचे आणि त्याकाळातील परिस्थितीचे वर्णन आहे. संत नामदेवांनी गावोगावी जाऊन लोकांचे प्रबोधन केले.स्वर्ग, मृत्यूलोक व पाताळाच्या कल्पनेतील समाजाला पंढरीच हे भूवैकुंठ आहे, हे सांगणारे पहिले संत नामदेव महाराजच आहेत. देवाधमार्माच्या नावाखाली समाजात कमालीची अंधश्रद्धा जोपासण्याचे काम सनातनी मंडळी करीत होती. जातीपातीच्या उतरंडीत सापडलेला सगळा समाज गुलामीचे जीणे जगत धन्यता मानीत होता. या सगळ्या समाजाला जाण व भान देण्याचे काम समाजसुधारक संतानी केले. त्यात संत नामदेव,संत कबीर, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत कबीर, संत ज्ञानेश्नर, संत एकनाथ,संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी केले, हे प्रबोधन करणार्य़ा संतांची परंपरा आहे. महिलांना ज्या काळात मनुस्मृतीमुळ सन्मानाची वागणूक मिळत नव्हती, त्याकाळात संत जनाबाई, संत कान्होपात्रा सारख्या संत झाल्या. यादवराजांच्या काळात महाराष्ट्रात उदयास आलेल्या सांप्रदायाला त्यांनी मदत केली. महानुभाव संप्रदायाचे संस्थपाक संत चक्रधर स्वामींनी बंड केले. संत बसवेश्वर, संत गुरुनानक व वारकरी चळवळीतील सर्वच समाजसुधारक संतानी प्रबोधनाचे काम केले. रामदेवराय यादवांनी पंढरपूरला मोठी मदत केल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. यादवराजे हे धामिर्मिक व सहिष्णूवृतीचे होते. हेमाडपंथी यादवकालीन शिल्पकला असलेली भव्य दिव्य आखीवरेखीव मंदिरे याच काळात झाली. प्राचीन शिल्पकलेचा तो एक सुंदर नमुनाच ठरला. याच धामिर्मिक वृतीमुळे तिजोरी रिकामी करून महंमद तुघलकांकडून मराठी राज्य पैसा नसल्याने लयाला गेले. त्यावेळी कोणता देव आणि धर्म राज्य वाचवायला आला नाही. दंतकथा व कल्पनेत वावरणार्यांची हीच अवस्था होते. याच काळात राज्यात संत नामदेव व ज्ञानेश्वरांदी संत समाजसुधारणेचे काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करीत होते.

न बोलतां तुम्हां कळों न ये गुज ।
म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥
आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात ।
नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं ।
करील तें हरी पाहों आतां ॥३॥  
 संत तुकाराम महाराजांनी समाजातील अनेक ढोंगावर अंभगातून प्रहार केले. खरे तर वारकरी संप्रदाय हा परिवतर्तनाचा पंथ आहे. त्याचा लोकांनी स्वीकार केला व वारकरी धर्म हीच महाराष्ट्राची व मराठी माणसांची ओळख बनली. पंढरपूर हे वारकरी चळवळीचे केंद्रबिंदू झाले. त्यानंतरच्या काळात आळंदी,देहू,पैठण या ठिकाणी काम जोरात सुरू झाले. हिंदूधमार्माच्या विरोधात बंड केलेल्या सुधारणावादी संताचा वारकरी संप्रदाय आहे. याचा आज समजाला व वारकऱयांना विसर पडल्याचे दिसते. जिथे दगड धोंड्यातील देवाला हद्दपार करायला निघालेले संतच पुढे काही अपप्रवृतींनी देवाच्या रुपात पुढे आणले. भागवत धमार्मात विठ्ठल हा एकच देव. बांधावरचे,शेंदराच्या देवाला स्थान नाही.लहान मोठा, गरीब श्रीमंत भेद नाही. तेहतीस कोटी देव बाजूला करून वारकरी चळवळीने विठ्ठल हा एकच देव समाजासमोर मांडला. सावळ्या विठ्ठलामुळे लोकांची देवाबाबतची भिती कमी झाली. लोक पंढरीच्या वारीच्या निमित्ताने चागंले आचरण व विचार करू लागले. लोकशाही मुल्यांची बीजे वारीत रुजली. कर्मकांड, होमहवन, भविष्य, ज्योतिष, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा केला. पण पुन्हा एकदा या वारीत सनातनीवृतीच्या माणसांनी शिरकाव करून हे वारकऱयांची दिशाभूल करू लागले.
कशासाठी देवा।      चालायची वाट।
वारकऱयांना कोण।    सांगीलबा।।
सावळ्या विठ्ठला।    सवाल हा माझा।
भागवत धर्म।       वाढवावा।।
समतेचा मंत्र।       संतानीच दिला।
वेशीच्या बाजूला।    गावकसा।।
हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिला. ज्या उद्देशाने वारी सुरू झाली. तो उद्देश समाज विसरून गेल्याचे चित्र वारीत चालताना पाहायला मिळते.
असा काय आहे, देवा तुझा भार।  चिरडून ठार। बहुजन।। जन्म तुझा देवा। समाजाला शाप। कशाला रे थाप। मारतोस।। तुझ्या देवपणे। फुलू दे निसर्ग। पुसावी ही जात। निर्मिकारे।।
अशी सांगण्याची वेळ देवांवर आली आहे. सध्या पंढरीच्या वारीचे बदलले स्वरुप स्वागतार्ह
असले तरी त्यात घुसलेल्या मंबाजीना हटविण्याची गरज आहे. समाज शुद्ध करण्यासाठी प्रतिगामी शक्तीनी वारकरी चळवळीचे आरोग्य धोक्यात येईल. गनिमांना घेऊन स्वराज्याची लढाई कशी जिकंता येईल. वारकर्यांच्या वेशात वारीत घुसलेले गनिम आता शोधावे लागतील. ज्या उद्देशासाठी चळवळ सुरू झाली. तो उद्देश बाजूला पडला. प्रबोधनाचा आत्मा हरवलेली वारकरी चळवळ मोठी दिसत असली तरी, ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला वेळ लागणार नाही. हा मोठा धोका निमार्माण झाला आहे. यावर वारकरी, प्रवचनकार, कीतर्तनकार, मानकरी, फडकरी, भालदार, चोपदार यांच्यात जागृती व्हायला हवी. शुदध आचार व विचारांची ही वारकरी चळवळ प्रदुषित करण्यासाठी सनातनी दलालांचा उपद्वव्याप सुरू आहे. वारकरी संप्रदायातील लोकांचा अभ्यास केला तर कीतर्तनकार जुन्या दंतकथा व अंधश्रद्धा वाढविणारे विषाणूच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमिताने सोडीत आहेत.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले।
तोचि साधू ओळखावा  देव तेथेचि जाणावा
हा संत तुकारामांचा उपदेश विसरून भाकड दंतकथा सांगून समाज सुदृढ होणार नाही याची जाणीव वारकरी संप्रदायाच्या प्रचारकांना होण्याची गरज आहे. वारकरी पंथात घुसेखोरी झाली आहे. साध्या भोळ्या वारकऱयांचा गैरफायदा घेण्याचा उद्योग सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो. गळ्यात टाळ अडकून हरिनामाचा जयघोष करीत पायी वारीने संत तुकाराम  व संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे मजल दर मजल करीत निघाले आहेत. पंढरीच्या वारीचे बदलते स्वरुप जर पाहिले तर वारकऱयांच्या वेषात कोण मंडळी प्रतिगामी ध्वज फडकवीत आहेत. वारीत घुसलेले दलाल, पैशासाठी वारकऱयांचा वापर करणारे दिंडीचालक, कीतर्तनकार, प्रवचनकार, ढोंगी वारकरी याचा शोध घेण्याची गरज आहे. तरच संत तुकारामांना अभिप्रेत असलेली चळवळ पुढे जाईल. दरवर्षी लाखो वारकरी वारी करीत आषाढीच्या महापूजेला विठ्ठल दशर्शनाच्या ओढीने पायी पंढरीला जातात. वारकऱयांच्या निखळ श्रद्धेचा उपयोग करुन घेतला तर पुन्हा वारकरी चळवळीला सत्याची धार आल्याशिवाय राहणार नाही.

वारीतील मंबाज
-------------------
दंतकथा, अंधश्रद्धा पसरविणारे कीर्तनकार
दिंडीतून वारकऱयांचे पैसे लुटणारे लुटारू
आचारणापेक्षा वेषभुषेतील बुवाबाजी
समाजात तेढ निमार्माण करणारे तथाकथित सेवक
जातीधमार्माचा वृथा अभिमान बाळगणारे
वारकर्यांचा गदीर्दीचा फायदा घेणारे ठग
व्रत,वैकल्या व धमर्मभोळेपणाचे ग्रंथ लिहिणारे
दुरुस्तीची गरज
-------------------
कीर्तनकार, प्रवचनकारांना प्रशिक्षण
वारकऱयांना देवाची खरी व्याख्या सांगावी
वेषभुषे पेक्षा आचारण व विचाराला प्राधान्य
प्रतिगामींनी पंथात अटकाव
अध्यात्म व विज्ञानाची सांगड हवी
प्रवचन,हरिपाठाचे विषय वाढवावेत


No comments: