वय सोळावं
चालताना झोल जातोया तोल
वय सोळावं लागलंय औंदा
झेपना भार अहो मनाला घोर
माझा लागला व्हायला वांदा
ओठाची लाली मिरवते गाली
चोळी व्हायला लागली तंग
जवानीची कुणी लुटा मजा
होऊ इश्काच्या प्याल्यात दंग
मन नाराहि स्थिर माजला काहूर
काळजात होतया माझ्या धस्स
स्पर्श सख्याचा गोड वाटतो
लाट वाटते बाई इश्य इश्य...
नशा इश्काची अंगात भिनली
आता मुसमुसलाय बघा बांधा
जवळी यावं मिठीत घ्यावं
रुपया लुटा जवानीचा बंदा
No comments:
Post a Comment