Popular Posts

Monday, December 10, 2012

क-हाकाठावरचे महात्मा फुले साहित्य संमेलन



क-हाकाठावरचे
महात्मा फुले साहित्य संमेलन
-----------------------------


पुरंदर ही शूर, वीर, समाजसुधारकांची भूमी. छ.संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवरायांची स्वराज्याची पहिली लढाई बेलसर येथे झाली. महाराष्टाचे कुलदैवत मल्हारी मातर्तंड खंडोबा, प्राचीन यादवकालीन भुलेश्वर, नारायणेश्वर, पांडेश्वर, संत सोपानदेवांची समाधी, असा एतिहासिक परंपरेचा वारसा अंगाखांद्यावर मिरवणार्या या क-हापठारावर आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक, शाहीर सगनभाऊ, आचार्य अतरे, अशी मंडळी होऊन गेली. याच मातीचा वारसा घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी मानवतेची चळवळ सुरु करून छ. शिवाजीमहाराजांवर पहिला कुळवाडीभूषण हा पोवाडा लिहिला.

जेजुरीचा भंडारा लावुनिया कपाळा
येथुनिया मराठा जिंकावया निघाला...

किंवा

अल्याड क-हा अन पल्याड निरा
हा शिवशाहीचा झरा रं...
शिवशंभुचा पुरंदर म्हणजे
मोतियाचा तुरा रं...
 या कवी दशरथ यादव यांच्या गीतातून पुरंदरचे वर्णन केले आहे.

एतिहासिक वारसा लाभलेल्या या भूमित पहिली महारांची परिषद झाली. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांची समाधी सासवडला आहे. याच मातीने शिवशाही नंतर पेशव्यांना सांथ दिली. पानिपतात क-हाकाठावरील ५२ सरदार होते..पिलाजीराव जाधवरावांचा इतिहास याच मातीतला..
येथूनच महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ पुढे गेली.
विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले!

हे सांगणारे महात्मा फुले यांच्या मूळगावी संमेलनाची सुरवात झाल्याने, राज्यातून लेखक व साहित्यिक आवडीने येतात. खानवडी आता भारताच्या नकाशावर झळकू लागले आहे.. समाजसुधारक म्हणून त्यांनी केलेल्या कामाला उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे..सत्यशोधक चळवळीचा विचार या निमित्ताने पुढे गेला तरच मानवता व समानता या म्हणन्याला अर्थ येईल. याच भावनेतून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८ साली सुरु केले आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश,छ्त्तीसगड, बेळगाव, कोकण, बिदर अशा ३५० शाखा व बारा हजार सभासद आहेत. या परिषदेच्यावतीने नवोदित साहित्यांके नेतृत्व केले जाते. नुकतेच १९ अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन सोलापूरला झाले. याशिवाय चार राज्यस्तरीय संमेलने परिषदेच्या वतीने घेतली जातात.    खानवडीत यंदा झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे उद्धघाटन महाराष्ट्र राज्य कृषी शि‍क्शन व संशोधन परिषदेचे उपाध्यक्श विजय कोलते यांच्या हस्ते झाले. कोकाटे सर संमेलनाध्यक्श होते. यावेळी माजी मंतरी बाळासाहेब शिवरकर, दादा जाधवराव, सुदामराव इंगळे, स्वागताध्यक्स पुणे महापालिकेचे नगरसेवक बंडुतात्य गायकवाड होते.
परिषदेच्यावतीने राज्यात विविध भागात काम करणा-या मान्वरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
समारोपावेळी झालेल्या कविसंमेलनाला मोठी गदी होती. उस्मानाबाद, बारामती, नगर, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, गोवा, कोल्हापूर येथून साहित्यिक आले होते. कविसंमेलनात सतीश मडके, योगेश मारके, परभणीचे संतोष नारायणकर, सोलापूरचे गोरख् भांगे, महेंद्र गायकवाड, सोमनाथ सुतार, जगदीप वनशीव, सागर शिंदे, गिरीश भांडवलकर, वषार्षा पवार, सोनाली यादव, अलका बनकर, पदमजा म्हस्के, सुवर्णा बनसोडे, विजया सांळुखे, हनुमंत चांदगुडे, ज्ञानेश चिंते,शेखर गीरी, परमेश्वर पालकर, दत्ता साकोळे यांनीही कविता सादर केल्या. दशरथ यादव यांनी सूतरसंचलन केले..
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गेली पाच वर्षापासून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले यांच्या मूळगावी खानवडी (ता.पुरंदर) येथे दरवषी २८ नोंव्हेबर रोजी होते. २००८ साली संमेलनाध्य्‍क्श साहित्यमातर्तंड यशवंतराव सावंत, उदघाटन प्राचार्य शिवाजीराव भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल वाघ होते. या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन, समारोप असे उपक्रम होत असतात. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्याकाळात मध्ये समाजात बंड करणारे महात्मा फुले यांच्या नावाने हे राज्यातील पहिले साहित्य संमेलन साहित्य परिषदेने सुरु केले. मुळचे पुरंदरचे असलेले व बातमीदारी व साहित्यात गेली वीस वषे काम करणारे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव यांच्या पुढाकाराने हे संमेलन सुरु झाले.त्यांच्या बरोबर परिषदेचे कार्याध्यक्श शरद गोरे, उपाध्यक्श राजकुमार काळभोर, यात सहभागी होते. पुणे जिल्हाध्यक्श बी.डी.गायकवाड, कार्याध्यक्श राजाभाऊ जगताप, तालुकाध्यक्श प्रा. केशव काकडे, सुनील लोणकर, नंदू दिवसे, सुनील धिवार, फुले, हे सहभागी असतात. यापूवी इतिहासाचार्य प्रा. मा.म.देशमुख, प्रा रतनलाल सोनग्रा, प्रा. गंगाधर बनबरे, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, इतिहास संशोधक प्रा. ऋईमंत कोकाटे, यांनी संमेलनाचे अध्यक्श म्हणून पद भूषविले आहे.
--------------------------------------

No comments: