Popular Posts

Friday, December 28, 2012


कृषीतंत्रज्ञान, वास्तव जीवन
साहित्यात येण्याची गरज

संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन


बारामती, ता. २८ ः  कृषीसंस्कतीमधील वास्तव जीवन व तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे महत्व साहित्यात आले तरच कृषीसाहित्य आणि शेतकरी जगाच्या बाजारात आपले स्थान निर्माण करू शकेल. असे प्रतिपादन राज्यस्तरीय पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने बारामती येथे लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. उल्लेखनीय काम करण्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. शाहीर रमेश खाडे यांच्या पोवाड्याने कायर्क्रमाची सुरवात झाली. यावेळी ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ साहित्यिक संभाजीराव मोहिते, बारामतीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई सातव, चित्रपट निर्माते नाना थोरात, परिषदेचे राष्ट्रीय कायार्याध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, जिल्हाध्यक्ष बी.डी गायकवाड, मराठा विभागाचे अध्यक्ष अॅड अविनाश आवटे, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष सतीश मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोआेळी बारामती ः लोकनेत शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन.
श्री यादव म्हणाले, मातृसत्ताक व कृषीसंस्कृतीशी नाळ जोडलेल्या या देशातील समाजाचे वास्तव चित्रण आजपर्यंतच्या साहित्यात हवे तेवढे उतरले नाही. कथा व कल्पनात लेखक साहित्यिक रमल्याने कृषीसाहित्य परिपूर्ण झाले नाही. पुरोगामी चळवळीचा वारसा असणारे, ग्रामीण,शहरी साहित्याने वैचारिक मंथन करण्याचे काम केले. मात्र कृषीसाहित्य त्यांच्यापासून दूर राहिले. कथा,कल्पना,नाट्य मनोरंजनात्म साहित्य लिहिणा-यांकडून वास्तव लेखन झाले नाही. हरितक्रांतीच्या पाच कलमी कायर्यक्रमाने शेती, सहकार, आधुनिक तंत्रज्ञानाच वापर वाढला. शेतीत अमूलाग्र बदल झाला त्याचा वेद  साहित्यात घेतला गेला नाही. अजूनही जुन्याच पद्धतीचे ग्रामीण जीवन साहित्या मांडणारे, लेखक,कवी यांनी वास्तव समाजजीवन साहित्यातून जपावे. 
 प्राचीनकाळी नदीच्या काठावर मातीत बियाण्याची पेरणी करणारी पहिला महिला निरुतीच्या नावाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो, असे सांगून श्री यादव पुढे म्हणाले, शेतीशास्त्रा मूळ गाभाच समाज विसरून गेला आहे. नसर्गाच्या लहरीपणाला कवेत घेत शेतीत सोन पिकवणा-या शेतक-यांच्या जगण्याला साहित्यात कीती स्थान मिळते.  याचा विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात साहित्य लेखन करणारी चांगली पिढी निमार्ण होते हे आशादायी चित्र आहे. ग्रामीण, दलित, भटक्या, प्रबोधन करणा-या साहित्य चळवळी पुढे येत आहेत. लोकांना प्रेरणा देणारे, जगण्यात आनंद निमार्ण करणारे साहित्यच समाजाला पुढे नेवू शकते.
यावेळी सौ. जयश्रीताई सातव, प्रा. पोतदार, प्रा. जाधव यांनी मनोगत व्यक्तत केले. प्रास्ताविक शरद गोरे यांनी केले. स्वागत बी.डी.गायकवाड यांनी केले. विजया साळुंखे यांनी आभार मानले.


चौकट
ज्येष्ठ साहित्यिक मा. दा. देवकाते यांच्या कतृत्वाचे स्मरण म्हणून बारामतीत दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मा. देवकाते मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. त्यांची सरकार दरबारी व महामंडळाकडून कायम उपेक्षाच करण्यात आली.

फोटोआेळी बारामती ः लोकनेत शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन.
krushi samelan 1.JPGkrushi samelan 1.JPG
3473K   View   Share   Download  

No comments: