Popular Posts

Monday, October 7, 2013

संमेलन प्रसिद्धीप्रमुख यादव



संमेलनाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी दशरथ यादव यांची निवड

---------------------------
३, ४ व ५ जानेवारीला सासवडला ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
-------------------------------------------------------------------------------------------
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी दशरथ यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संमेलनाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते व निमंत्रक रावसाहेब पवार यांनी सांगितले.
दि.३, ४ व ५ जानेवारी २०१४ रोजी सासवड़ येथे साहित्य संमेलन होत असून, आचार्य़ विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होत आहे. क-हाकाठावर होणारे हे संमेलन भव्यदिव्य व्हावे असा सगळ्यांचा प्रयत्न असून, ते ऐतिहासिक व्हावे या दृष्टीने तयारी सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज, संत सोपानदेव, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजीबाळा, आचार्य अत्रे, यशवंतराव सावंत अशी साहित्याची मोठी परंपरा क-हाकाठाला आहे. श्री यादव गेली गेली वीस वर्षाहुन अधिककाळ पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी वारीच्या वाटेवर, उन्हातला पाऊस, यादवकालीन भुलेश्वर, वारीचे खंडकाव्य, चार कांदब-या, दोन कवितासंग्रह, अंभग, लावणी, गाणी, पोवाडा, सिनेमासाठी कथा, पटकथा, संवाद व गीतलेखन केले आहे. राज्यभर शेकडो कविसंमेलनातून साहित्यचळवळ फुलवली आहे. शेकडो व्याखाने दिली असून, विपुलप्रमाणात साहित्यलेखन केले आहे.

No comments: