Popular Posts

Saturday, July 7, 2012

संतविचारांचा दिवा उजळूया


संतविचारांचा दिवा उजळूया

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा लोकदेव विठ्ठल आणि जेजुरीचा खंडोबा हे भाविकांचं श्रद्धास्थान . महाराष्ट्रातले लोक विठुरायाची वारी करतात तशी खंडेरायाचीही न चुकता मल्हारवारी करतात. वारी म्हणजे येरझारा घालणं. आपल्या आवडत्या देवाच्या गावी न चुकता जाणं. महाराष्ट्रात हजारो वर्षांपासून वेगवेगळया विचारांचे प्रवाह आहेत. त्यातच एक आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरणारा.
तर दुसरा त्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करणारा. यातूनच सांस्कृतिक लढा उभारला गेला. या माध्यमातूनच प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगानं मान्य केली. गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश सगळ्या जगाला प्रेरणा देत आहे. हाच शांतीचा संदेश देणारा विचार प्रवाह शेकडो वर्षे बाजूला गेला होता. पण याच विचारांचा आधार घेत  संतांनी भागवत धर्माची स्थापना केली. प्रबोधनाचा विचार रुजवायला सुरुवात केली. हे विचार किती तळागाळापर्यंत रुजले आणि फोफावलेत, हे पंढरपूर वारीचा ओघ पाहिल्यावर लक्षात येतं.
हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा, जातीयता, देवाधर्माच्या नावाखाली होणारे अमानुष प्रकार, मानसिक गुलामी याविरोधात बंड करून संतांनी नव्या पंथाची (धर्माची) स्थापना केली. यात संत बसवेश्वराचा पंथ, संत चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ आणि भागवत अर्थात वारकरी पंथ यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. त्या काळात देवाधर्माच्या नावाखाली समाजात कमालीची अंधश्रद्धा जोपासली जात होती. जातीपातीच्या उतरंडीत सापडलेला सगळा समाज गुलामीचं जीणं जगत होता. या सगळ्या समाजाला जाण आणि भान देण्याचं काम या समाजसुधारक संतांनी केलं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत कबीर, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या संतांचा पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल. ज्या काळात महिलांवर प्रचंड बंधनं होती, त्या काळात संत जनाबाई, संत कान्होपात्रा यांसारख्या वारकरी संत झाल्या. या सर्वांनी अत्यंत प्रभावीपणानं प्रबोधनाचं काम केलं. संत नामदेवांनी तर भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन वारकरी धर्म देशभर पोचवला. उत्तर भारतात त्यांनी वारकर्यांचं तत्वज्ञान रुजवलं. नामदेव तिथं एवढे लोकप्रिय झाले की त्यांची ठिकठिकाणी मंदिरं उभारली गेली. शीखांच्या गुरु ग्रंथसाहिबमध्ये तर नामदेवांचे 61 अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत.
नामदेवांचाच हा वारसा संत तुकारामांनी पुढं चालवला. समाजातल्या ढोंगांवर त्यांनी अभंगांतून प्रहार केले. सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. वारकरी धर्म हीच महाराष्ट्राची आणि मराठी माणसांची ओळख बनली. पंढरपूर हे वारकरी चळवळीचं केंद्र बनलं.
आळंदी, देहू, पैठण या ठिकाणीही हेच काम जोरात सुरू झालं. विठ्ठल हा एकच देव. बांधावरच्या शेंदर्या-हेंदर्या दैवतांची सुट्टी करण्यात आली.
लहान -मोठा, गरीब-श्रीमंत असे भेद नष्ट करण्यात आले. तेहतीस कोटी देव बाजूला सारून वारकरी चळवळीनं विठ्ठल हे उपास्य दैवत समाजासमोर मांडलं. पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलामुळं लोकांची देव धर्म, कर्मकांड याबाबतची भिती कमी झाली. लोक पंढरीच्या वारीच्या निमित्तानं चांगला विचार, आचरण करू लागले. लोकशाही मूल्यांची बीजं रुजली गेली. कर्मकांड, होमहवन, भविष्य, ज्योतिष, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा राहिला. पण आपण ही परंपरा विसरलो की काय, अशी परिस्थिती वारीच्या वाटेवर आणि एकूणच वारकरी पंथात सध्या पाहायला मिळते आहे. कीर्तनकारांनी संतांचे विचार जनतेसमोर मांडायला हवेत. पण  ते गुंतलेत कीर्तनातून संतांच्या दंतकथा, कपोलकल्पित चमत्कार सांगण्यात. अंधश्रद्धा वाढवण्याचा हा नवाच प्रकार. कीर्तन म्हणजे समाजसेवा. समाजाचं प्रबोधन करण्याचं माध्यम. निर्लोभीपणानंच ही कीर्तनसेवा करणं अपेक्षित असतं. तुकाराममहाराज तर म्हणतात, जिथं कीर्तन कराल तिथं पाण्याचा थेंबसुद्धा घेऊ नये. पण आता भरमसाठ मानधनाशिवाय कीर्तनाची तारीखच पक्की न करणारे कीर्तनकार तयार होऊ लागलेत. असे लक्ष्मीच्या मागं धावणारे कीर्तनकार काय प्रबोधन करणार, असा प्रश्नच आहे. वारकरी काय किंवा मानकरी काय, सगळेच संतांच्या विचारांपासून दूर जात आहेत, असं खेदानं म्हणावं लागेल. ज्ञानेश्वरमाऊलींच्या पालखीसोहळ्यात संतांच्या नावांनी अठरापगड जातीच्या दिंडय़ा चालतात. या दिंडय़ांमध्ये मोठा घोळ सुरू आहे. शेकडो वर्षे वाटचाल करणार्या अनेक दिंडय़ा विकल्या जात आहेत. वारकर्यांची लूट करून पैसा कमावण्याच्या उद्देशानं दिंडी मालक पछाडले आहेत. मान्यताप्राप्त दिंडीत चालण्यासाठी वारकर्यांकडून भरमसाठ फी घेतली जात आहे.
आश्चर्य वाटेल पण पावसासाठी आता वारीत होमसुद्धा करायला सुरुवात झालीय. ही कुठली वाटचाल म्हणायची? कर्मकांडाच्या विरोधात लढा उभारणार्या माऊलींनाच आता सोवळ्या-ओवळ्यात पुजलं जातंय. नैवेद्यसुद्धा वेगळे वेगळे दाखवले जातायत.
देवाच्या नावाखाली मानकरी वर्षाची चंदी मिळवण्याचा प्रयत्न करतायत. गळ्यात माळ घालून अनेक महाराज प्रतिगामी चळवळी घेऊन वारकर्यांमध्ये येत आहेत. माऊलींचे वारकरी कुंभमेळ्याला जातात, त्यांचा खर्च संस्थान करते, यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं? कुंभमेळा आणि वारकरी संप्रदाय यात काही फरक आहे की नाही? कवीवर्य कुसुमाग्रज यांनी या प्रकाराचा आपल्या `पर्वणी’ या कवितेतून चांगलाच समाचार घेतला आहे. ते या कवितेत म्हणतात,
व्यर्थ गेला तुका। व्यर्थ ज्ञानेश्वर।।
संतांचे पुकार वांझ झाले।।
रस्तोरस्ती साठे बैराग्यांचा ढीग।
दंभ शिगोशीग तुडुंबला।।…असे कवितेत भरपूर कोरडे ओढलेले आहेत. कवितेत शेवटी कुसुमाग्रज तुकोबारायांच्या अभंगाच्या ओळी उधृत करतात.
तुका म्हणे ऐसे मावेचे मईंद।
त्यापाशी गोविंद नाही नाही।।
कुसुमाग्रजांनी केलेला हा जागर लेखक, कवींनी पुन्हा एकदा करण्याची गरज आहे.
सर्वसामान्य वारकरी, प्रवचनकार, कीर्तनकार, मानकरी, फडकरी, भालदार, चोपदार यांच्यात याविषयी जागृती व्हायला हवी.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा।।
हा संत तुकारामांचा उपदेश सर्वत्र रुजवायला हवा. संतविचारांचा लामणदिवा घासूनपुसून लख्ख करायला हवा. त्याचा उजेड पुन्हा एकदा सर्वत्र पसरायला हवा.
पंढरपुरात कटेवर कर ठेवून उभ्या राहिलेल्या सावळ्या विठ्ठलामुळं लोकांची देव धर्म, कर्मकांड याबाबतची भिती कमी झाली. कर्मकांड, होमहवन, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा राहिला. पण आपण ही परंपरा विसरलो की काय, अशी परिस्थिती सध्या आहे.

dasharath yadav event photo














पुरंदरचा किल्लेदार

पुरंदरचा किल्लेदार
वारीच्या गावात

माझ्या वारीच्या गावात
रोज नवी नवलाई
टाळ मृदंग वीणेतून
रोज भेटते विठाई

माझ्या वारीच्या गावात
मळे भक्तीचे फुलतात
माणसांच्या ताटव्यांना
फुले हरिनामाची येतात

दिंड्या दिंड्याची पाले
रोज माळावर उतरतात
रात्र सरता सरता
वाट पहाटेची चालतात

गाव चालता बोलता
वारा ढोल वाजवितो
पावलांच्या तालावर
मग मृदंग नाचतो

विठ्ठलाची पूजा आम्ही
रोज नव्याने बांधतो
ओव्या अंभगाची फुले
ताजी देवाला वाहतो

माझ्या वारीच्या गावात
ओव्या अंभगाचे धन
रोज लुटतात वैष्णव
शब्दा शब्दांचे सोनं

वारीच्या गावात सत्ता
माऊलीची अशी चाले
मुक्या टाळातून देव
रोज आमच्याशी बोले

भगवी वस्त्रे गुंडाळून
सूर्य दर्शनाला येतो
माझ्या गावाच्या चरणी
माथा रविकरांचा टेकतो

विठ्ठलही रोज इथं
मुक्कामाला येतो
पहाट होण्या अगोदर
गाव उचलून नेतो

दशरथ यादव, पुणे                                                                                                                                        

रिंगण, धावा, भारुडाने वारक-यांमध्य़े चैतन्य


--------------------------------
रिंगण,  धावा, भारुडाने
वारक-यांमध्य़े चैतन्य
वेळापूर उत्साही स्वागत

दशरथ यादव----------- पंढरीची वारी
वेळापूर, ता. २६ – वारीच्या वाटेवरील निम्याहून जास्त अंतर पार करून पंढरीसमीप आलेल्या वारक-यामध्ये रंगलेले रिंगण, धावा..व भारुडाने चैतन्य आले. टाळमृदंगाच्या निनादात नाचत गात माऊलींच्या सोहळ्यातील वैष्णव रिमझीम पावसाच्या हलक्याशा सरी अंगावर झेलत अर्धनारीनटेश्वराच्या भूमीत वेळापूरला सायंकाळी मुक्कामी पोचले. ग्रामस्थांनी उत्साही स्वागत केले. उद्या (ता.२७) रोजी पालखी भंडीशेगावला जाईल.
भल्या पहाटे माऊलींचा सोहळा माळशिरसकरांचा निरोप घेऊन वाट चालू लागला. सकाळी आठ वाजता खुडूस गावाच्या हद्दीत काळ्या मातीच्या शिवारात अश्वाने बेफाम दौड करीत रिंगण केल्याने वारकर्यांची अवस्था भाग गेला शीण गेला अवघाचि झाला श्रीआनंद अशीच झाली होती. सकाळच्या शीतल वातावरणात भगव्यापताकांची दाटी शिवारात शोभून दिसत होती. हिरव्यागार शिवारात रंगलेले रिंगण व उडीच्या खेळाचा वारक-यांनी मनसोक्त आनंद घेतला. रिंगणानंतर उडीचे निमंत्रण राजाभाऊ चोपदार यांनी सर्व दिंडीकर-यांना दिले. त्यानंतर टाळांचा गगनभेदी आवाजाने उडीचा खेळ रंगला. वारीच्या वाटचालीत सगळ्या दिंडीतील टाळकरी फक्त रिंगणाच्यावेळी एकत्र येतात.  ।लक्ष लक्ष डोळियांनी आज म्या पाहिले रिंगण। लाखो नजरांनी रिंगणाचा नयनमनोहर सोहळा मनात साठवला. त्यानंतर दुपारी बारा वाजता पालखी निमगाव पाटीच्या माळावर भोजनासाठी थांबली. परिसरातील भाविकांनी दशर्शनासाठी रांग लावली होती.
सावताने केला।    भक्तीचा हा मळा।
लावला हो लळा।   शिवाराचा।।

पंढरीच्या वाटे।    कोणी ना परखे
भेटतील सखे।    पांडुरंग।।

मातीचा बुक्का।  कपाळी लावता।
भगवाच हाता।  झेंडूमळा।।

अशीच अवस्था हिरव्यागार शेताशिवाराच्या सोबतीने वाटचाल करताना झाली होती. निमगाव पाटीजवळ मोहितेपाटील कुंटुबियांच्या वतीने माऊलीची पुजा झाली. त्यानंतर सोहळा पुन्हा वाट चालू लागला. हितेपाटील कुटुंबियाच्या वतीने माऊलींची पूजा झाली. त्यानंतर सोहळा पुन्हा भगव्या पताका फडफडत चालू लागला. माऊलींचा पालखी रथ धीम्यागतीने पुढे सरकत होता. दिंड्या दिंड्यात हरिपाठाचे अंभग रंगले होते.
सांयकाळी चार वाजता माऊलींचा अश्व वेळापूरच्या धावाबावी माथ्यावर आला. याठिकाणी सगळे वारकरी धावत धावत खाली येतात. संत तुकारामांना या माथ्यावरून श्रीविठ्ठलाचे दर्शन झाल्याने ते धावत धावत गेले अशी वारक्रयांची श्रद्धा आहे.
तुका म्हणे धावा। आहे पुढे पंढरी विसावा।
हा अंभग गात गात वारकरी धावत होते. हा नयनमनोहर क्षण टिपण्यासाठी मोठी गदीर्दी जमली होती. पायथ्याला दिंड्यात भारुडाचे कायर्यक्रम रंगले होते. पालखी समोर भारूड करण्याचा मान शेडगे दिंडीला असून त्यांच्या वतीन लक्ष्मण राजगुरु यांनी वेडीचे भारुड करुन धमाल उडवून दिली. यावेळी श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार, दिंडीचे मालक जयसिंग मोरे, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, मानकरी उपस्थित होते. दरम्यान एका बाजूला मला दादला नको गं बाई हे भारुड दिंडीत रंगले होते. मी लाडकी लेक मी  संताची गं लाडकी लेक मी संताची अशी अनेक भारुडे दिंडया दिंड्यात रंगली होती. भारुडाने वारक-यांत चैतन्य पसरले होते. सायंकाळी उशीरा पालखी तळावर समाजारती झाली. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने पंढरीच्या वारक-यांचे स्वागत केले. उद्या टप्पा येथे संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव यांची बंधू भेट होणार असून, तोंडले बोंडले येथे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा माऊलींच्या सोहळ्याबरोबर एकत्र येईल.

वारकरी चळवळ धोक्याच्या वळणावर............


     
वारकरी चळवळ धोक्याच्या वळणावर............
--------------------------------------------
वारीच्या वाटेवर..........दशरथ यादव,पुणे  (संत साहित्याचे अभ्यासक)
----------------------------------------------------------------------
महाराष्टाचे आराध्य दैवत असलेला पंढरपूरचा लोकदेव विठ्ठल आणि जेजुरीचा खंडोबा हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मराठी माणसांच्या मनात या  दोन्ही लोकदेवाबाबत आदराचे स्थान आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त जसे वारी करतात तसे मल्हारी मातर्तंड खंडोबाचे भक्त न चुकता मल्हार वारी करतात. वारी म्हणजे येरझारा घालणे. आपल्या आवडत्या स्थळाला देवाला न चुकता जाणे. महाराष्ट्रात हजारोंवर्षापासून वेगवेगळया विचारांचे प्रवाह आहेत. एक प्रवाह स्वतःच्या स्वाथार्थासाठी समाजाला वेठीस धरणारा. तर दुसरा प्रवाह त्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी संघर्ष करणारा. यातूनच सांस्कृतिक लढा उभारला गेला. आणि मग धर्म, पंथ, संघटना, गटतट उभे राहिले. समाजाचे सांस्कृतिक जीवनाशी नाळ घट्ट असल्याने याच सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रबोधनाचा लढा उभा राहिला. भारत ही बुद्धाची भूमी म्हणून जगाने मान्य केली. पण भारतात दोन मतप्रवाह असल्याने काहींनी टीका केली. अंजिठ्याची लेणी उजेडात आली आणि पुन्हा बुद्ध हसला. गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश सगळ्या जगाला प्रेरणा देत आहेत. हाच शांतीचा संदेश देणारा विचार प्रवाह शेकडो वर्षे बाजूला गेला होता. पण याच विचाराचा आधार घेत समाजात काही प्रमाणात प्रबोधनाचा जागर सुरू होता. याच प्रवाहाचा मोठा बोलबाला  पुन्हा एकदा भागवत धर्माची स्थापना करून संतानी हा प्रबोधनाचा विचार रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. आज वारीचे मराठी माणसांच्या मनातील स्थान पाहिल्यावर कळून येते. पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही बुद्धांची मूर्ती असल्याचे संशोधनातून पुढे येत आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाला लोकदेव मानून वारकरी संतानी गौतमाचा विचार समाजात रुजवला. भागवत धमार्माची नाळ ही बुद्ध विचारात आहे, हे सांगायाला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
हिंदू धमार्मातील चुकीची प्रथा, अंधश्रद्धा, जातीयता, देवाधमार्माच्या नावाखाली होणारा अमानुष प्रकार, मानसिक गुलामी याविरोधात बंड करून समाजसुधारक संतानी मनूस्मृतीचे कायदे मोडून काढीत नव्या पंथाची (धर्माची) स्थापना केली. त्यातून संत बसवेश्वराचा पंथ, संत चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथ, भागवत धर्म (वारकरी पंथ) व गुरुनानकांनी शीख पंथाची निर्मीती केली. हे सगळे धर्म हिंदूधमार्मातून बाहेर पडलेले आहेत. त्यांचे आचरण वेगळे, कायदे वेगळे व देवही वेगळे आहेत. हिंदू धर्मार्शी यांचा आता काही संबध नाही. पण अजूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही सनातनी वृतीचे लोक करीत असतात. काहींनी तर वारकरी संप्रदायात येऊन पुन्हा या संप्रदायाला मूळ उद्देशापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न चालविला आहे.
वारकरी चळवळीचा    
केंद्रबिंदू सरकतो आहे
परिवर्तनाच्या पोटात
प्रतिगामी शिरतो आहे

चमत्काराची भाषा
कुणी वारीत करु नये
चुंबकाचा कस असा
वारीला लावू नये
वारकरी पंथाला चांगले दिवस आले ते राजारामदेवराय यादव यांच्या काळात. अकराव्या शतकात देशात चांगले दिवस होते. देवगिरीच्या यादवांची सत्ता महाराष्ट्र व देशाच्या अनेक भागात विस्तारली होती. यादवराजे धामिर्मिक व सहिष्णूवृत्तीचे होते. राज्य सुखसमाधान होते. संपत्तीचे गोकुळ वसले होते. दरम्यानच्या काळात संत बसवेश्वरांनी समाज जागृतीचे काम केले. संत चक्रधरस्वामींनी महानुभाव पंथ स्थापन करून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. याच काळात भागवत धमार्माची पताका खांद्यावर घेऊन संतनामदेवांनी वारकरी धर्म देशभर पोचवला. पंजाबात त्यांनी समाजात प्रबोधन केले. शीखांच्या गुरुबानीमध्ये संत नामदेवांचे ५२ अंभग आहेत. गुरुनानकांनीही परिवतर्तनासाठी शीख पंथ स्थापन केला. सगळ्या संत कवींनी समाजाचे प्रबोधनासाठी पंथ स्थापन करून समाज सुखी करण्यासाठी कष्ट घेतले. राजारामदेवराय यादव यांनी वारकरी पंथासाठी मोठी मदत केल्याचा उल्लेख पंढरपूरच्या शिलालेखात आहेत. हेमाडपंथी यादवकालीन शिल्पकलेची भव्यदिव्य आकाराची मंदिरे यादवांच्या काळात झाली. कोट्यावधी रुपये त्याकाळात खचीर्ची झाले. यावरुन यादवांच्या राज्यात गोकुळ नांदत होते हे स्पष्टपणे लक्षात येते.
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत राजारामदेवराय यादवांच्या कारभाराचे आणि त्याकाळातील परिस्थितीचे वर्णन आहे. संत नामदेवांनी गावोगावी जाऊन लोकांचे प्रबोधन केले.स्वर्ग, मृत्यूलोक व पाताळाच्या कल्पनेतील समाजाला पंढरीच हे भूवैकुंठ आहे, हे सांगणारे पहिले संत नामदेव महाराजच आहेत. देवाधमार्माच्या नावाखाली समाजात कमालीची अंधश्रद्धा जोपासण्याचे काम सनातनी मंडळी करीत होती. जातीपातीच्या उतरंडीत सापडलेला सगळा समाज गुलामीचे जीणे जगत धन्यता मानीत होता. या सगळ्या समाजाला जाण व भान देण्याचे काम समाजसुधारक संतानी केले. त्यात संत नामदेव,संत कबीर, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत कबीर, संत ज्ञानेश्नर, संत एकनाथ,संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी केले, हे प्रबोधन करणार्य़ा संतांची परंपरा आहे. महिलांना ज्या काळात मनुस्मृतीमुळ सन्मानाची वागणूक मिळत नव्हती, त्याकाळात संत जनाबाई, संत कान्होपात्रा सारख्या संत झाल्या. यादवराजांच्या काळात महाराष्ट्रात उदयास आलेल्या सांप्रदायाला त्यांनी मदत केली. महानुभाव संप्रदायाचे संस्थपाक संत चक्रधर स्वामींनी बंड केले. संत बसवेश्वर, संत गुरुनानक व वारकरी चळवळीतील सर्वच समाजसुधारक संतानी प्रबोधनाचे काम केले. रामदेवराय यादवांनी पंढरपूरला मोठी मदत केल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. यादवराजे हे धामिर्मिक व सहिष्णूवृतीचे होते. हेमाडपंथी यादवकालीन शिल्पकला असलेली भव्य दिव्य आखीवरेखीव मंदिरे याच काळात झाली. प्राचीन शिल्पकलेचा तो एक सुंदर नमुनाच ठरला. याच धामिर्मिक वृतीमुळे तिजोरी रिकामी करून महंमद तुघलकांकडून मराठी राज्य पैसा नसल्याने लयाला गेले. त्यावेळी कोणता देव आणि धर्म राज्य वाचवायला आला नाही. दंतकथा व कल्पनेत वावरणार्यांची हीच अवस्था होते. याच काळात राज्यात संत नामदेव व ज्ञानेश्वरांदी संत समाजसुधारणेचे काम वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करीत होते.

न बोलतां तुम्हां कळों न ये गुज ।
म्हणउनी लाज सांडियेली ॥१॥
आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात ।
नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥
तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं ।
करील तें हरी पाहों आतां ॥३॥  
 संत तुकाराम महाराजांनी समाजातील अनेक ढोंगावर अंभगातून प्रहार केले. खरे तर वारकरी संप्रदाय हा परिवतर्तनाचा पंथ आहे. त्याचा लोकांनी स्वीकार केला व वारकरी धर्म हीच महाराष्ट्राची व मराठी माणसांची ओळख बनली. पंढरपूर हे वारकरी चळवळीचे केंद्रबिंदू झाले. त्यानंतरच्या काळात आळंदी,देहू,पैठण या ठिकाणी काम जोरात सुरू झाले. हिंदूधमार्माच्या विरोधात बंड केलेल्या सुधारणावादी संताचा वारकरी संप्रदाय आहे. याचा आज समजाला व वारकऱयांना विसर पडल्याचे दिसते. जिथे दगड धोंड्यातील देवाला हद्दपार करायला निघालेले संतच पुढे काही अपप्रवृतींनी देवाच्या रुपात पुढे आणले. भागवत धमार्मात विठ्ठल हा एकच देव. बांधावरचे,शेंदराच्या देवाला स्थान नाही.लहान मोठा, गरीब श्रीमंत भेद नाही. तेहतीस कोटी देव बाजूला करून वारकरी चळवळीने विठ्ठल हा एकच देव समाजासमोर मांडला. सावळ्या विठ्ठलामुळे लोकांची देवाबाबतची भिती कमी झाली. लोक पंढरीच्या वारीच्या निमित्ताने चागंले आचरण व विचार करू लागले. लोकशाही मुल्यांची बीजे वारीत रुजली. कर्मकांड, होमहवन, भविष्य, ज्योतिष, अंधश्रद्धा मातीत गाडून नवा समाज उभा केला. पण पुन्हा एकदा या वारीत सनातनीवृतीच्या माणसांनी शिरकाव करून हे वारकऱयांची दिशाभूल करू लागले.
कशासाठी देवा।      चालायची वाट।
वारकऱयांना कोण।    सांगीलबा।।
सावळ्या विठ्ठला।    सवाल हा माझा।
भागवत धर्म।       वाढवावा।।
समतेचा मंत्र।       संतानीच दिला।
वेशीच्या बाजूला।    गावकसा।।
हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिला. ज्या उद्देशाने वारी सुरू झाली. तो उद्देश समाज विसरून गेल्याचे चित्र वारीत चालताना पाहायला मिळते.
असा काय आहे, देवा तुझा भार।  चिरडून ठार। बहुजन।। जन्म तुझा देवा। समाजाला शाप। कशाला रे थाप। मारतोस।। तुझ्या देवपणे। फुलू दे निसर्ग। पुसावी ही जात। निर्मिकारे।।
अशी सांगण्याची वेळ देवांवर आली आहे. सध्या पंढरीच्या वारीचे बदलले स्वरुप स्वागतार्ह
असले तरी त्यात घुसलेल्या मंबाजीना हटविण्याची गरज आहे. समाज शुद्ध करण्यासाठी प्रतिगामी शक्तीनी वारकरी चळवळीचे आरोग्य धोक्यात येईल. गनिमांना घेऊन स्वराज्याची लढाई कशी जिकंता येईल. वारकर्यांच्या वेशात वारीत घुसलेले गनिम आता शोधावे लागतील. ज्या उद्देशासाठी चळवळ सुरू झाली. तो उद्देश बाजूला पडला. प्रबोधनाचा आत्मा हरवलेली वारकरी चळवळ मोठी दिसत असली तरी, ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला वेळ लागणार नाही. हा मोठा धोका निमार्माण झाला आहे. यावर वारकरी, प्रवचनकार, कीतर्तनकार, मानकरी, फडकरी, भालदार, चोपदार यांच्यात जागृती व्हायला हवी. शुदध आचार व विचारांची ही वारकरी चळवळ प्रदुषित करण्यासाठी सनातनी दलालांचा उपद्वव्याप सुरू आहे. वारकरी संप्रदायातील लोकांचा अभ्यास केला तर कीतर्तनकार जुन्या दंतकथा व अंधश्रद्धा वाढविणारे विषाणूच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमिताने सोडीत आहेत.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले।
तोचि साधू ओळखावा  देव तेथेचि जाणावा
हा संत तुकारामांचा उपदेश विसरून भाकड दंतकथा सांगून समाज सुदृढ होणार नाही याची जाणीव वारकरी संप्रदायाच्या प्रचारकांना होण्याची गरज आहे. वारकरी पंथात घुसेखोरी झाली आहे. साध्या भोळ्या वारकऱयांचा गैरफायदा घेण्याचा उद्योग सध्या सुरू असलेला पाहायला मिळतो. गळ्यात टाळ अडकून हरिनामाचा जयघोष करीत पायी वारीने संत तुकाराम  व संत ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे मजल दर मजल करीत निघाले आहेत. पंढरीच्या वारीचे बदलते स्वरुप जर पाहिले तर वारकऱयांच्या वेषात कोण मंडळी प्रतिगामी ध्वज फडकवीत आहेत. वारीत घुसलेले दलाल, पैशासाठी वारकऱयांचा वापर करणारे दिंडीचालक, कीतर्तनकार, प्रवचनकार, ढोंगी वारकरी याचा शोध घेण्याची गरज आहे. तरच संत तुकारामांना अभिप्रेत असलेली चळवळ पुढे जाईल. दरवर्षी लाखो वारकरी वारी करीत आषाढीच्या महापूजेला विठ्ठल दशर्शनाच्या ओढीने पायी पंढरीला जातात. वारकऱयांच्या निखळ श्रद्धेचा उपयोग करुन घेतला तर पुन्हा वारकरी चळवळीला सत्याची धार आल्याशिवाय राहणार नाही.

वारीतील मंबाज
-------------------
दंतकथा, अंधश्रद्धा पसरविणारे कीर्तनकार
दिंडीतून वारकऱयांचे पैसे लुटणारे लुटारू
आचारणापेक्षा वेषभुषेतील बुवाबाजी
समाजात तेढ निमार्माण करणारे तथाकथित सेवक
जातीधमार्माचा वृथा अभिमान बाळगणारे
वारकर्यांचा गदीर्दीचा फायदा घेणारे ठग
व्रत,वैकल्या व धमर्मभोळेपणाचे ग्रंथ लिहिणारे
दुरुस्तीची गरज
-------------------
कीर्तनकार, प्रवचनकारांना प्रशिक्षण
वारकऱयांना देवाची खरी व्याख्या सांगावी
वेषभुषे पेक्षा आचारण व विचाराला प्राधान्य
प्रतिगामींनी पंथात अटकाव
अध्यात्म व विज्ञानाची सांगड हवी
प्रवचन,हरिपाठाचे विषय वाढवावेत