Popular Posts

Tuesday, September 17, 2013

हाय विठोबा..
















हाय विठोबा..


कसली माळ कसला टाळ अजून होतो विटाळ
हाय..विठोबा सांगा कसं पेलायचे हे आभाळ

आल्या पिढ्या गेल्या कीती युगे झाली फार
मनुवाद्यांच्या मेंदूत अजून सुरुच आहे कुटाळ

कान्होपात्रा जनाबाई जात्यावर दुःख दळतात
भगवा ध्वज खांद्यावर तरी वारकरीच नाठाळ

कीर्तन, प्रवचन हरिपाठात बदल कराया हवा
मनू घुसल्याने वारीत परिवर्तन झाले भटाळ

नामा ज्ञाना तुकाचं खरं कुणी सांगत नाही
तेच देव त्याच कथा ऐकून झाल्यात रटाळ

वारीचा धंदा झालाय दिंडी म्हणजे मलिदा
चोर झालेत श्रीमंत गरीबांची होते आबाळ

नोट दाखवा बघा दर्शनाला नाही लागत वेळ
तूप लोणी खाऊन हा बडवा झालाया चाठाळ

दशरथ यादव, पुणे

No comments: