Popular Posts

Friday, September 20, 2013

भारतदर्शन संस्कृती

भारतीय संस्कृतीचे आद्यवाडःमय

१) सूतवाडःमय व सूतसंस्कृती

भारतीय वाडःमयात वेदग्रंथाचे आक्रमण होण्यापूवी सूत संस्कृती ही पुर्वेस बिहार, दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत पसरली होती. सिंहलद्वीपातही हीच संस्कृती होती. शिव, विष्णू ही या संस्कृतीची दैवते. यांचा विद्याधर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, पिशाच्च व देवयोनिवंर या संस्कृतीचा विश्वास होता. यात अग्निधर्म संपुष्टात पण थोडा शिल्लक होता. यात मुनि व यति हे दोन परमार्थास वाहिलेले वर्ग होते.वीरकथा, दृष्टांतदाखले,, उपदेशपरकथा हे साहित्य होते.या संस्कृतीचा काळ म्हणजे दाशराज्ञ युद्धपूर्व म्हणजे दाशरथी रामाचा काल येतो. मातृ व सूत संस्कृतीचया लोकांचा संबध आल्यावर दोहोंची मिळून एक संस्कृती गंगेच्याकाठी निर्माण झाली. सूतांशी संबध जोडण्यासाठी पौराणिक ग्रंथातील राजांची नावे यज्ञविधीशी जोडण्यात आली. तसेच नाग, गंधर्व पिशाच यांन यज्ञविधीतील दिवस वाटले व शिव, विष्णूंची अर्वाचीन काळी परिचित स्वरुपे तक्तालीन वेद व यंज्ञमंत्रात शिरली. या दोघांच्य संपर्काने यज्ञकर्म तात्पुरते विस्तीर्ण झाले.पुढे देशांची उचल होऊन यज्ञकर्म संपुष्टात आले. तसेच भारतीय संस्कृतीस पुन्हा सूतसंस्कृतीचे वळण मिळाले. वैदिक संस्कृती केवळ अंगास चाटून गेल्यासारखे झाले. परंतु पुढे यज्ञकर्तेपणामुळे उत्पन्न झालेली ब्राम्हणज्ञातीने पुढे स्थानिक संस्कृती जशी अशी घेऊन तिचे विधिनिषेधे, उत्सव, वाडःमय,सणवार यांच्यामध्ये व्यवस्थिपणा आणण्यास सुरवात केली. त्यामुळे सूतसंस्कृतीचे स्वरुप जरी बदलले नाही तरी तिच्यावर वेदास मानणा-या ब्राम्हणाचे दडपण पडले. व या संस्कृतील लोक वैदिक संस्कृती म्हणू लागले. आपणापाशी जे सूतसंस्कृतीचे जे वाडःमय. आहे ते ब्राम्हण, बौद्ध व जैन आवृतिकारांनी विकृत केलेले मिळाले आहे. त्यामुळे सूतसंस्कृती कथेचे खरे स्वरुप हे अनुमानानेच काढावे लागते. महाभारत हे त्या प्रकारच्या कथांचे मुख्य संग्रहस्थान आहे. काही सूतकथा रामायण, पुराणे यात ग्राथत झाल्या तर काही कथासरित्सागर
ग्रंथात आहेत.

महाभारत (सूतकथा) -

महाभारत हा एक वीरकथासंग्रह असून तो काव्यमय ग्रंथभांडार आहे. महाभारत म्हणजे भरतांच्या महायुद्धाचा वृतांत. भरत हे क्षात्रिय राष्ट्र होते. दुष्यंत व शकुतंला यांचा पूत्र भरत हा भरतांच्या राजवंशाचा मूळ पुरुष. हे गंगा यमुना नद्यांच्या वरील भागाकडे राहत. या वंशजापैकी कुरु राजा फार प्रमुख  होता. त्यांचे वंशज ते कौरव. हे भारत लोकांवर खूप काळ राज्य करीत होते. त्यावरून एका राष्ट्राला कुरु कौरव हे नाव मिळाले. यालाच कुरुक्षेत्र असे म्हणतात. महाभारत हा शब्द महाभारताख्यानम याचा संक्षेप शब्द आहे. कौरवांच्या राजघराण्यातील भांडणावरुन रक्तपात झाला. यात कुरु व भरताचे घराणे यांचा नायनाट झाला. महाभारतावरून युद्धाची माहिती मिळते पण पुरावे सापडत नाही. तरी महाकवीने युद्धाची हकीकत गीताच्या रुपाने मांडली आहे.शेकडो वषार्षात या वीरकाव्यात बराच समावेश होत गेला. अनेक दंतकथांचा त्यात समावेश झाला...महाभारताचे मूळ काव्य हे सुतकथामधील भाग आहे. परंतु त्यात कालानुरुप अनेकांनी समानेश केल्याने त्याचे मुळकथानक किंवा काव्य शोधण जड आहे. महाभारत हे वीरकाव्य आहे. पण तसेच ते सुतांचे साहित्यभांडार आहे. वीरकाव्य ही सूतांची असून ती ब्राम्हणांच्या ताब्यात कशी गेली. त्यात काय बदल झाले. सूतांच्या वीरकाव्याचा त्यांनी उपयोग करुन पौराणिक देवाच्या गोष्टी रचून, धर्मशास्त्र, ज्ञान, उपदेशपर गोष्टी, ब्राम्हणतत्वज्ञान यात उपयोग करुन ब्राम्हणांचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. वीरकाव्यात अदभुत दंतकथा व गोष्टी घुसडुन त्याकाळी समाजावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. महाभारत हे फार लोकप्रिय असून, क्षत्रिय लोकामध्ये त्याचा प्रसार झाल्याने या ग्रंथावर वैदिक परंपरेचा संस्कार झाला नाही. वेद जाणणा-या ब्राम्हाणांनी ग्रंथ फार दुरुस्ती करुन सुधारविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण क्षात्रधर्म मृतकल्प होऊन अरण्यकयी धर्माकडे ब्राम्हणाधि सगळे गेले त्यामुळे ब्राम्हणांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणीही धर्म व यज्ञयागाबाबत अगदी थोडी माहिती आढळते. महाभारतात सुधारणा करुन त्यांचे उपबहृण करण्याचे काम ज्यांनी केले ते बहुधा पुरोहितच होते. शिव, विष्णू या पौराणिक देवांच्या कथांची जोपासना त्यांनीच केली. पुराणाच्या धतीर्तीवर स्थानिक कथा, विष्णू व शिव यांच्या कथा यांचा प्रवेश महाभारतात झाला. ज्या ठिकाणी मोठा देव म्हणून विष्णूची पूजा प्रचलित होती तेथे वीरकाव्याची अधिक जोपासना झाली. ब्राम्हणाशिवाय हिंदुस्थानात धर्मपारायण लोकांचा एक वर्ग होता. ते हिरारीने वाडमयाचा प्रसार करीत. हे संन्यासी, वानप्रस्थाश्रमी व भिक्षू लोक होत. बुद्धांच्यावेळी प्रचलित असलेले पंथ याच लोकांनी काढले. यतिचे तत्वज्ञान व नीतीशास्त्र याचाही महाभारतात पुढे समावेश झाला. महाभारत हे वीरचरित्र असले तरी भारतीय ग्रंथकार ते महाकाव्य असे समजतात. या ग्रंथाचे अठरा भाग केले असून प्रत्येकाला पर्व असे नाव दिले आहे. हरिवंश या नावाचा एक भाग पुरवणीत जोडला. शंभर पर्वामध्ये विभागणी केलेल्या एकदंर श्लोकांची संख्या एकलक्ष आहे. कृष्णद्वपायन ऋषी किंवा व्यास त्याने हा ग्रंथ रचला असे म्हणतात. महाभारतातील नायकांचा हा समकाली व नातलगही होता असा त्यांचा संबध आढळतो. काव्याची दंतकथात्मक उत्पती दिली असून, मूलधर्मग्रंथ या दृष्टीने स्तुती केली. जुन्या लेखाचे काव्यात नवीन लोकांनी टाकलेली भर स्पष्टपणे रचनेवरुन जाणवते. महाभारत हा एकच ग्रंथ नसून अनेक ग्रंथाचे भांडार आहे.

व्यास जन्माची दंतकथा

- पराशर नावाचा ऋषीचा हा पूत्र. एके दिवशी सत्यवती या ऋषीच्या नजरेस पडली. ही मुलगी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडली होती. कोली लोकांनी तिचे पालन व पोषण केले. तिचे सौदर्य पाहुन मोहित होऊन तिच्या बरोबर समागम करण्याची ईच्छा त्याने व्यक्त केली. पूत्र झाल्यावर आपले क्रौमार्य परत मिळावे या अटीवर तिने ऋषीचे म्हणणे कबुल केले. दोघांचा समागम झाल्यानंतर यमुनानदीमधील एका द्वीपामध्ये तिला पूत्र झाला. द्विपामध्ये जन्मला म्हणून त्याचे नाव द्विपायन ठेवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तप करायला निघून गेला. सत्यवती पुन्हा कुमारी झाली. नतर कुरुराजा शंतनु याच्याशी तिचे लग्न झाले.चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र तिला झाले. शंतनु व चित्राडगद मरण पावल्यावर विचित्रवीर्य राजा झाला. पण तो निपुत्रिक झाला. त्याला दोन बायका होत्या. आपला वंश बुडु नये म्हणून धर्मशास्त्रानुसार द्वैपायनाने भावजयीच्या ठिकाणी संतती उत्पन्न करावी यासाठी सत्यवतीने द्वैपायना बोलावणे पाठविले. द्वैपायन हा कुरुप होता तरी काळा केस दाढी कांती काळी होती. (म्हणूनच त्याचे कृष्ण नाव काळा म्हणून असावे.) त्याचा प्रंचड वास येत होता. एका राजपुत्रीजवळ तो जाताच त्याची मुद्रा असह्य झाल्याने तिने डोळे मिटून घेतले तिला जन्मांध पुत्र झाला तो हाच धुतराष्ट्र होय. व्यास दुस-या स्त्रीजवळ गेला तेव्हा त्याला पाहुन ती पांढरी फटफटीत झाली. तिला निस्तेच असा पूत्र जन्माला आला तो म्हमजे पांडू.महाभारतातील पाच महानायकांचा हा पिता. द्वैपायनाने आणखी एका स्त्रीशी समागम करण्याचे ठरविले परंतु ती हुशार असल्याने तिने आपल्या एवजी दाशीला पाठविले.ही गोष्ट ऋषीच्या लक्षात आली नाही. त्या दाशीला विदूर नावाचा पूत्र झाला...पांडु व धृतराष्ट्र यांचा तो मित्र होता. धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकन्या गांधारी हिच्या बरोबर झाले. त्चांना शंभर मुलगे. दुर्योधन हा थोरला होता. पंडुंला दोन बायका होत्या. थोरली यादवराजकन्या कुंती व धाकटी मद्रराजकन्या माद्री. कुंतीला धमर्म,भीम,अर्जुन व माद्रीला नकुल व सहदेव ही मुले होती. हा कुरुप व दुर्गंधीवान ऋषी कृष्णद्वैपायन व्यास हा महाभारतातील नायकांचा पितामह होता असे अनक ग्रंथावरुन समजते. महाभारतातील या दंतकथा व मांडणी किंवा उत्पत्ती वास्तव वाटत नाही. व्यासानी आपले मोठेपण  सिद्ध करण्यासाठी केलेला हा खटाटोप असावा असेही दिसून येते..

महानायकांचा जन्म
१८८६ साली जर्मनीत एडाल्प हाल्टझमन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध करुन महाभारताच्या स्वरुपाची चिकित्सा केला. महाभारतात खूप काव्य शिरल्याने तो वीरगीतांचा अवशेष होता. जुन्या ग्रंधाच्या शब्दशा भाषांतरापेक्षा प्राचीन सुतवर्ग
जे महाभारत गात त्यावरुन केलेला अभ्यास हा योग्य होईल असे त्याला वाटले. कौरव पांडवाच्या लढाईचा मुख्यभाग शोधणयाचा प्रयत्न केला.

भरतखंड  ः 

हिंदुस्थान हे, चीन, असुरिया, बाबिलोनया, पॅलेस्टाईन इजिप्त, या प्राचीन राष्टापैकी आहे. एतिहासिक काळ अजून निश्चित नसला तरी काही प्राचीन लेख, खोदलेख, इमारती, वाडमय याचे संशोधन होउन काळ निश्चिक होणे बाकी आहे. ख्रिस्तपूर्व निदान चार हजारवर्षे पासून मयादा समजण्यासा वाडमयाचा पुरावा आहे. हिंदुस्थानचे प्राचीन भूवर्णन काळात विभागले आहे. महाभारतकाल, वेदकाल, सिंकदरकाल, अशोककाल, कनिष्ककाल, गुप्तकाल, हूणकाल,हर्षकाल, चोलकाल,चव्हाणकाल,यादवकाल, विद्यारण्यकाल असे कालखंड आहेत. वेदकाळापूवी द्रविड व आर्य यांची वस्ती होती. रामरावण युद्ध त्यावेळचे होते. रामायणातील वर्णन वेदपूवकाळातील मान्यकरता येत नाही कारण नंतरही टप्याने त्याचे लेखन झाले आहे. देशाचे वणर्णन वेदकालीन ग्रंथातही त्रोटकच आहेत. भरतखंडाच्या वर्णनात देशातील नद्या, पर्वत, प्रदेशांची यादी आहे. भरतखंडात १५६ देश सांगितले तर ५० देश हिंदूस्थानात आहेत. उत्तरेकडील म्लच्छाशिवाय २६ देश सांगितले आहेत. कुरुक्षेत्राच्या दक्षिणेस शूरसेन देश. याची राजधानी मथुरा यमुना किना-यावर आहे. पश्चिमेस मत्स्यदेश (जयपूरजवळ० होता.कुंतीभोजाचादेश चर्मणवती नदीकाठी (ग्वाल्हेर). निषिधदेश (नलराजाचा देश) नरवारप्रांत शिंदेसरकाराच्या ताब्यात आहे तो. अवंती म्हणजे माळवा.,उज्जयनी, विदर्भ म्हणजे हल्लीचे व-हाड, राजधानी भोजकट होती. महाराष्ट्राचे नाव संबध महाभारतात कोठेच नाही. याचा अर्थ महाराष्ट त्यावेळी नव्हता असे नाही. मोठे स्वरुप आले नवह्ते. त्याचे लहान लहान भागांची नावे                 महाभारतातील देशांच्या यादीत आली आहेत. रुपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र या तीन राष्टांचे मिळून महाराष्ट्र पुढे बनले. यात मुळीच शंका नाही. भोजांचे जसे महाभोज झाले. तसे राष्ट्रांटे महाराष्टिक झाले. अश्मक हा देश देवपीरीच्या भोवतालच्या प्रदेशाला धरुनच होता. महाराष्ट्रातील लोकापैकी अश्मक हे मुख्य होते, गोपराष्ट्र हा नाशिकच्या भोवतालचा प्रदेश. पांडुराष्ट्रही त्याला जोडुन असावे. मल्लराष्ट्रहि एक भाग असावा. चारपाच लोकांचे राष्ट्र मिळून ते महाराष्ट्र म्हणून प्रसिद्धीस आले असावे. गुजरातचा महाभारतात उलेख नाही मात्र सौराष्ट्राचा आहे. दक्षिणेकडे जे देश सांगितले ते कोकण, मावळ. मालव म्हणजे घाटमाध्यावरील मावळे. दक्षिणेतील आणखी चोल, द्रविड, पांडुय, केरल, माहिषक हो होत. यांची नावे चोल -मद्रास, चोलमंडल-कोरोमंडल, तंजावर हे द्रविड होय, पाडुय तिनेवल्ली, केरल-त्रावणकोर, माहिष-म्हैसूर ही नावे ठरविता येतात. पश्चिमेकडील सिंधू-सिंधप्रांत, सौबीर, कच्छ हो देश होत.कच्छच्या उतरेला गांधार आहे. मध्य हिंदुस्थानात सतलजपासून गंगेच्यचा मुखापर्यंत येत. सुपीक व भरभराटीच्या प्रांतापैकी बहुतेक प्रांत येत. ह्युएनत्संगच्या वेळच्या ८० राज्यापैकी, ३७ राज्य यात होती. स्थानेश्वर, वैराट, मत्स्यदेश, श्रुन,मडावर, ब्रह्मपूर, अहिचछत्र, पिलोपेण, संकिसा, संकास्या, मथुरा, कनोज, अयुटो, उत्पलारण्य, हयमख प्रयाग, कौशांबी, कुशपूर, विशाखा, साकेत, अयोध्या, श्रावस्ता कपिली, कुशीनगर, वाराणशी, गजपतिपूर, वैशाली, वज्र, नेपाळ, मगध, हिरण्यपर्वत, चंपा, कांकजोल, पौड्रवर्धन, जझोटी, महेश्वरपूर, उज्जनी,माळवा, खेडा, आनंदपूर, वचडारी, इदर.
 पुर्वेकडे हिंदुस्थानात आसाम, बंगाल, संभळपूर, ओरिसा, गंजम, तापी व महानदी भागात कलिंग, राजमहेंद्री, कोसल, आंध्र, तेलगण, धनकट, कांचीपूर, कोकण.धनककट देशाचा परिसर १००० मैल. जोरिया- ४०० मैल, द्रविड-१००० मैल, कोकण,  मथुरा, परिसर ८३३ मैल, महाराष्ट्राच्या राजधानीपासून भडोचचे अंतर १६७ मैल होते. देशाचा घेर १००० मैलाचा होता.राज्यच्या पुवेला मोठा बुद्धविहार होता. सिलोन हे सातवया शतकात सिंहलदीप नावाने प्रसिद्ध होते. तेथून आलेले यात्रेकरु ह्युएन यास कांची येथे भेटले त्याच्यापासून सिलोनची माहिती मिळाली. घेर ११६७ मैल होता. उतर दक्षणि लांबी २७१ मैल व रुंदी १३७ मैल होती. 

यादवकाळ ः
 (१४ वे शतक) दक्षिणेत देवगिरी यादव राज्य करीत असताना उत्तर हिंदुस्थानात राज्यक्रांती झाली. तेथील गुलाम घराणे जाऊन खिलजी घराणे अधिषठित झाले. अल्लाउद्धीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी करुन रामदेवराव यादवापासून एलिचपूर घेतले. तसेच गुजराथ काठेवाड पादाक्रांत केले. कच्छ मात्र आपले स्वातंत्र्य कसेबसे टिकवून राहिले. चितोड, सिबाना  जालोर मुसलमानांच्या हाती पडली. खिलजीचा सुभेदार मलिक काफरने दक्षिण दग्विजयाला प्रारंभ केला. वारंगळचा राजा मुकाट्याने त्याचा मांडलिक बनला. रामदेवला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. बल्लाळाचे राज्य खालसा झाले. महाराष्ट्र व कर्नाटक मुसलमानाचे स्वामीत्व पत्करले.१३१८ ला मलिकने मलबार जिंकले यादवाचे राज्य संपले.

No comments: