Popular Posts

Saturday, September 7, 2013

मराठा आरक्षण ( भाग १)

मराठा आरक्षण 

शोध व बोध  ( भाग १)

विषमता संपविणारी युगक्रांती..
----------------------------------
दशरथ यादव, पुणे

मराठा आरक्षणाची चर्चा जशी सुरु झाली, तशी स्वतःला सवर्ण म्हणणारे काही मराठे जणू आता आपली राजगादी जाणार अशीच समजूत करुन कोकलत राहिले. मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश झाला म्हणजे मोठे काही तरी संकट आहे, अशी ओरड करुन ओबीसीवर्गातील काही जाणकार म्हणणारे गळा काढून रडू लागले. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा निणर्य म्हणजे पुन्हा एकदा बळी, गौतम बुद्धाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणावी लागेल. गौतमाच्या विचारांचे शिवराज्याची ही नांदीच म्हणाना. मराठ्यांनी ओबीसी वगार्गात प्रवेश करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताची पायाभरणी होय. ब्राम्हणवर्गाच्या बाजू बाजूला घोटाळून स्वतःला सवर्ण म्हणत जगणा-या मराठयांचा इतर मागस वर्गात प्रवेश म्हणजे विषमता मोडून काढणारी, सनातनी गाडणारी व जातीअंताची भव्य क्रांती आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी अनेक महापुरुष, संत, समाजसुधारकांनी प्रयत्न केला पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या चळवळी त्या काळापुरत्या राहिल्या. त्याला कायमस्वरुपाची बैठक देण्याचे काम मराठा सेवा संघ, संभाजी बिग्रेड व शिवधर्मामुळे झाले आहे. महात्मा फुल्यांनी सत्यधर्मा्च्या माध्यमातून मोठा प्रयत्न केला. मधल्या काळात फुल्यांची चळवळ थोडी थंड झाली होती, पण कांशीराम व पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्या परिश्रमातून मोठी क्रांती बहुजनसमाजात झाली. मराठा आरक्षण हा त्यां क्रांतीचाच एक भाग आहे. समाजात स्वतःला सवर्ण मानणारा मराठा कुणबी समाज ओबीसीसमाजत येईल, त्यातून पुन्हा एकदा शिवसंस्कृतीचा काळ उभा राहिल. माणसात, मनात आणि् घराघरात मतभेद करणार सनातनी पंथ आपोआप बाजूला जाईन. याचीही पहिली पायरी आहे, म्हणून मराठा आरक्षणाला सवलतीच्या पलीकडे एक वेगळे मह्त्व आहे. समतेसाठी आटापिटा करणारेच सध्या मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊन कोणत्या तरी समुहाच्या स्वार्थासाठी मराठा कुणबी व ओबीसी वर्गात दरी पाडीत आहेत. मराठा आरक्षण ही विषमता संपविणारी युगक्रांती ठरणार आहे. आरक्षणाच्या सवलतीपलीकडे जावून याचा विचार केला तर एकसंध समाजाच्या पायाभरणीचे कामही होणार आहे.

मराठा आरक्षण मुळात गरीब निमूर्लनाचा कार्यक्रम नाही. मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण द्या हे घटनेत बसत नाही, सविंधानाचे कलन १६-४ नुसार ज्यांना सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणामुळे पुरेसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही, त्यांना देता येते.मराठा समाज स्वतःला क्षत्रिय मानतो. मंडल आयोगाने त्यांना प्रगत मानले आहे, देशातील सगळया राज्यात आरक्षण असून पकेज आहे, नोकरी, शिक्षण व राजकीय सत्ता असे आहे, महाराष्ट्रात फक्त नोकरी व शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी आहे. राज्यात सवार्धिक शिक्षण संस्था सत्ताधा-यांच्या मालकीच्या आहेत. ते स्वजातीला मोफत किंवा सवलतीत का शिक्षण देत नाहीत. साखर काऱखाने, सुतगिरण्या, दुधसंघ, सोसायट्या, पंतसंस्था, सहकारी बॅंका ताब्यात असूनही समजातील गरजू मुलांना कुठे मदत होते, देशाच्या संपत्तीत सगळ्यांचा वाटा नाही काय़
महात्मा फुले, शाहु व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे पन्नास वषार्षातील सामाजिक वास्तव कसे बदल गेले बघा. मराठा ही सत्ताधारी जात, मराठा व कुणबी या दोघांची लोकसंख्या एकुण तीस टक्के...मात्र ही संख्या पन्नास टक्के असल्याचे भासवले जाते. त्यात कुणबी अगोदरपासूनच ओबीसीमध्ये आहेत. गेल्या ६० वर्षात वेगवेगळ्या ९ आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यास नकार दिला आहे. बापट आयोगानेही विरोध केला आहे. मात्र मराठ्यांनी कुणबीच्या दाखवल्यावर निवडणूक लढवून ते सत्ता भोगीत आहेत. मात्र मराठ्यांना ओबीसीतील लोक जवळ घ्यायला तयार नाहीत त्यातून संघर्ष होणार आहे, पण मराठयांना आरक्षण दिले तर त्याचा उपयोगा केवळ सवलती पुरता होईल असे नाही, तर  एकसंध भारताची पायाभरणी करण्यासाठी होईल. हे नाकारून चालणार नाही. आरक्षणाला विरोध करणारे अजूनही जुनाट संस्कृतीच्या विचाराचे पाईक दिसत आहेत. कायम ब्राम्हण समजाने फसवीत मराठ्यांना सवर्ण केले पण वागणूक आणि फायदे मात्र शुद्रापेक्षा खालचे दिले हे कबुल कऱण्याची मानसिकता अजूनही मराठा समाजात होईना. मुळात ज्या कुणबी समाजाला मराठा म्हणून संबोधले जाते त्याचा मूळ इतिहासही तपासण्याची गरज आहे. पण याकडे दुलर्लक्ष करुन  ओबीसी बांधवांना काही मतलबी हितकर्ते फसवून भडकावीत आहेत. मऱाठे जर आरक्षणात आले तर आपले काय ही भीती समाजात निमार्ण केली जात आहे. ही अनाठायी आहे. आरक्षणाचा फायदा घेऊन कोण कोण गलेलठ्ट झाले ते बघा. किती तरी सवलतीचा फायदा घेवून मोठे झालेत. तर कीती तरी मराठा समाजातील लोक हलाखीत जीवन जगत आहेत. विदर्भीत आत्मह्त्या करणा-यामध्ये ९० टक्के लोक मराठा आहेत. ज्याना खरी आरक्षणाची गरज आहे, त्यांना मिळत नाही. ज्यांनी लाभ घेतला आहे ते हक्क सोडायला तयार नाहीत. ही सध्याची स्थिती आहे.
 ज्या सनातीनी मुळे समाजात आरक्षणाची आणि समतेसाठी लढण्याची वेळ आली त्यांच्या विरोधात लढा उभारुन लोकांच्या जागृती करणा-या फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचाराएवजी केवळ स्वाथार्थासाठीच काही जण मराठा आरक्षणाला विरोध करीत आहेत. ब्राम्हण व ब्राम्हणेत्तर चळवळ करुन जागृती करीत समाज उभा राहिला..पण सध्या मराठा व मराठेत्तर असा वाद निमार्णा करण्याचा उद्योग काही सनातनी वैदिक मंडळी ओबीसी समाजातील शहाणे हाताशी धरुन करीत आहेत. हे समाज उभारणीच्या कामातील मोठा अडथळा आहे. अजूनही आपण जातीअंताची लढाई करण्याच्या गप्पा मारीत असताना जात सोडीत नाही हे मोठे दुदैव समोर येते.

आरक्षणाचे वास्तव
चार एप्रिलला मराठा आऱक्षणाचा डंका वाजला. मुंबइला महामोर्चा निघाला. त्यावेळी दोन महिन्यात निणर्णय जाहीर करण्यात येईल असे सरकारने सांगितले. बाकीच्याना आरक्षण चालते पण मराठ्यांना आरक्षण म्हटले की मुठी आवळल्या  जातात. तो मराठा दोष म्हणून. ही मानसिकता इतर समाजात रुजायला कारणही तसे सनातनी न इथली संस्कृतीच आहे. पण सगळ्यांना तिचा सोयीस्कपणे विसर पडलेला दिसतो. मराठ्यांच्या हातात सत्ता आहे असे दिसत असले तरी ते मराठा असूनही सत्ताधारी मराठ्यांसाठी काही करीत नाही हा आजवरचा अनुभव आहे, मराठा समजातील लोक सत्तेवर आहेत, त्यामुळे इतर जातीसमूहात द्वेष निमार्ण झाला. जेधे-जवळकरांची सत्यशोधक चळवळ मराठ्यांनी काॅग्रेसमध्ये विलीन केल्याने मोठा तोटा झाला.त्यांनंतर घराणेशाहीची सत्ता सुरु झाली. सत्यशोधक चळवळ सुरु असती तर केव्हाच अस्तित्वाची जाणीव होऊन मराठा असल्याचा अंहकार कमी झाला असता. तसेच आरक्षणाचा विषय मागी लागला असता. मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ, गोपीनाध मुंडे पुढे आले. मिडियाच्या साह्याने टीवटीव करीत राज ठाकरे कोकलत आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी २६ जून १९०२ साली ब्राम्हण, पारशी, कायस्थ, शेणवी वगळता मराठा तसेच इतर बहुजन बांधवाना शिष्यवृती व सेवेत आरक्षण देवून वस्तीगृहाची व्यवस्था केली.
राजस्थानात गुर्जर, हरियाणात जाटांच्या जातीय आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.मराठा शब्दाला प्रदेशवाचक शौर्यवाचक, बलिदानवाचक व त्यागाची झालर आहे. सध्या राज्यात काही जण प्रांतिक, भाषिकवाद करीत आहेत.ब्राम्हणी धमार्मानुसार वागणार बहुजन मंगलकामात सत्यनारायण घालून सत्यानाश करुन घेतो. मराठा हा समूह कधीच संघटीत नसतो. डॅा बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची जणगणना, आरक्षासाठी १९५४ ला कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंत लगेचच पटना (बिहार) येथे बॅकवडर्ड क्लासच्या अधिवेशनात डा.पंजाबराव देशमुख, आर.एल.चंदापुरीच्या निमंत्रणाने गेले तेव्हा पंजाबरावांना नेहरुने कृषीमंत्री केले. जातीनुसार मंत्रीपदे बहाल केली जातात. जसे पंजाबराव देशमुख, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांना कृषीमंत्रीपद दिले.

दशरथ यादव, पुणे

No comments: